उमरखेड/महागांव ला दोन दिवसात मदत यादीत समाविष्ट करा, साहेबराव कांबळे काँग्रेस प्रदेश सरचिटणीस यांनी राज्य सरकारला दिला इशारा
- CT India News
- Oct 10
- 1 min read
उमरखेड/महागांव ला दोन दिवसात मदत यादीत समाविष्ट करा, साहेबराव कांबळे काँग्रेस प्रदेश सरचिटणीस यांनी राज्य सरकारला दिला इशारा
महागाव यंदाच्या खरीप हंगामातील अतिवृष्टी आणि पैनगंगा व पूस नदीच्या महापुराने उमरखेड व महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे अक्षरशः शंभर टक्के नुकसान होऊन, शेतकरी वर्गाला जगणे उद्ध्वस्त झाले. पिकांसह जमिनीचेही मोठे नुकसान होऊन शेतकरी डोंगराच्या खाईत उभा असताना, राज्य सरकारने काल ९ ऑक्टोबरला जाहीर केलेल्या मदतीच्या यादीत या दोन तालुक्यांचे नावच वगळले आहे. या भोंगळ निर्णयामुळे शेतकरी वर्ग संतप्त झाला असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळे यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत टीका करीत, बोलताना सांगितले येत्या दोन दिवसात उमरखेड महागाव तालुक्यांची नावे मदत यादीत सामावून घ्या व दिवाळी पूर्वीच मदत पोहोचवा. अन्यथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कडून रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा गंभीर इशारा देण्यात आला आहे.
साहेबराव कांबळे यांनी सांगितले की, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने दोन्ही तालुके पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. हजारो हेक्टरवरील पिके वाहून गेली, जमिनीची धूप झाली, आणि शेतकरी कर्जाच्या वावटळीत सापडला. काँग्रेसने यापूर्वीच भरघोस मदतीची मागणी केली होती. काँग्रेसने निवेदन व आंदोलनही केले, मात्र सरकारने केलेली मदत ‘तोकडी आणि अन्यायकारक’ असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. कांबळेंनी राज्यसरकारला इशारा देत सांगितले की, उमरखेड व महागाव तालुके, येत्या दोन दिवसांत मदतीच्या यादीत समाविष्ट न केल्यास, दिवाळीपूर्वी आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू. जर या अन्यायामुळे एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली, तर राज्यसरकार व त्यांच्या प्रतिनिधीस जबाबदार धरण्यात येईल. असा हल्लाबोल केला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील सर्वाधिक नुकसानग्रस्त तालुके म्हणून नोंद असूनही, उमरखेड आणि महागाव यांना वगळणे ही शासनाची निष्ठुरता आणि असंवेदनशीलता असल्याचे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळे यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्य सरकार आता काय निर्णय घेते याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या. आहे
जिल्हा प्रतिनिधी एस के शब्बीर महागाव यांची रिपोर्ट









Comments