top of page

उमरखेड/१५ दिवसापुर्वी मिळून आलेल्या पैनगंगा नदी पात्रात फेकलेल्या मयत बॉडी खुनाच्या गुन्हयातील दोन आरोपी गजाआड

  • Writer: CT India News
    CT India News
  • Nov 2
  • 2 min read

उमरखेड/१५ दिवसापुर्वी मिळून आलेल्या पैनगंगा नदी पात्रात फेकलेल्या मयत बॉडी खुनाच्या गुन्हयातील दोन आरोपी गजाआड



पुसद स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या कामगिरीला यश पैनगंगा नदीपात्रात पाण्याच्या प्रवाहात एक अनोळखी इसम वय 50 वर्ष, ज्याचे दोन्ही हात रंगीबेरंगी शेल्याने बांधलेल्या स्थितीत मिळून आल्याने त्याबाबत उमरखेड पोलीस स्टेशन मर्ग क्रमांक 62/2025 कलम 194 Bnns चे चौकशीत मा. वैधकीय अधिकारी उमरखेड यांच्या अहवाला वरुन उमरखेड पोलीस स्टेशन अप क्रमांक 685/2025 कलम 103(1), 238 भान्यास प्रमाणे दिनांक 30/10/2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.


सदर गुन्हयातील अनोळखी पुरुष यांचे प्रेताची पाहणी करता त्यास कोणीतरी अज्ञात इसमांने कोणत्या तरी कारणाने जिवेठार मारुन पुरावा नष्ट करण्याच्या उददेशाने त्याचे हात बांधून पैनगंगा नदीपात्रात टाकलेल्या स्थितीत मिळून आल्याने त्याबाबत मा. पोलीस अधीक्षक सा यवतमाळ यांनी पोलीस निरीक्षक सा स्थागुशा यवतमाळ यांना सदर मृतक यांची ओळख पटवून त्याप्रमाणे तपास करण्याचे आदेशित केले होते. पोलीस निरीक्षक, स्थागुशा यवतमाळ यांनी त्यांचे अधिनस्थ स्थानिक गुन्हे शाखा कॅम्प पुसद पथक यांना सदर गुन्हयातील मृतक यांची ओळख पटवून त्याचे मारेकरी यांचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणन्याकरीता आदेशित केले

दिनांक 01/11/2025 रोजी महाराष्ट्र राज्याच्या ऑनलाईन वेब साईटवर दाखल मनुष्य मिसींगची बारकाईने पाहणी करीत असतांना पो स्टे उमरी जि नांदेड येथील मनुष्य मिसींग रजि नं 25/25 मधील मिसींग इसम हा मृतक यांच्या वर्णनांशी मिळता जुळता असल्याचे लक्षात आल्याने त्याबाबत वरिष्ठ अधिकारी यांना माहीती देवून त्यांच्या आदेशाप्रमाणे उमरी पो स्टे हददीतील कळगांव जि. नांदेड येथे जावून सदरची मयत बॉडी ही इसम नामे मारोती गुणाजी सोनकर रा.कळगाव ता.उमरी जि. नांदेड यांची असल्याची ओळख पटवून सदर मिसींग बाबत मृतंक यांचे जवळचे नातेवाईक यांच्याकडे विचारपूस करीत असतांना मृतक यांचा सख्खा लहान भाउ इसम नामे-गणेश गुणाजी सोनकर व मृतक यांचा भाचा अमोल किसनराव श्रीमंगले यांच्यावर संशय बळवल्याने त्यांना ताब्यात घेवून पोलीस कौशल्याचा वापर करुन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सर्वप्रथम उडवा-उडवीचे उत्तरे देवू लागल्याने त्यांना अधिक विश्वासात घेवून कौशल्यपुर्ण रितीने विचारपूस केली असता मृतक हा नेहमी दारु व गांजा सेवन करुन आम्हाला तसेच घरातील सर्व लोकांना मारहाण व सततचा त्रास देत असल्याने त्यास सर्व कुटूंब वैतागलेले होते व त्यामुळे आमचे सर्वाचे जिवन जगने असहय झाले होते त्या कारणावरुन दिनांक 14/10/2025 रोजी दोन्ही आरोपी यांनी मिळून मयत यास भोकर येथून दारुच्या नशेत मोटार सायकलवर सोबत घेवून बेबर गावच्या हददीत निर्जनस्थळी नेवून प्रथम त्याचा गळा दाबून व डोक्यात पाठीमागून लाकडी दांडक्याने मारुन मोठी जखम करुन त्यास जिवेठार मारले व पुरावा नष्ट करण्याच्या उददेशांने त्याचे हात बांधून त्यास मोटार सायकलवरुन आणून हदगाव उमरखेड रोडवरील मोठया पुलावरुन पैनगंगा नदीच्या पाण्याच्या प्रवाहात टाकले असल्याचे निष्पन्न करुन आज उमरखेड पोलीस स्टेशन अप क्रमांक अप क्रमांक 685/2025 कलम 103(1), 238 भान्यास हा अतिशय क्लिष्ट गुन्हा उघड करुन आरोपी 1) गणेश गुणाजी सोनवर वय 31 वर्ष, रा. कळगांव ता.उमरी जि नांदेड 2) अमोल किसनराव श्रीमंगले वय 25 वर्ष, कोळगांव पो उमरी (ज) जि. नांदेड यांना कळगांव ता उमरी जि नांदेड येथून ताब्यात घेवून पुढील तपास कामी पोलीस स्टेशन उमरखेड यांच्या ताब्यात दिले.


सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता (भा.पो.से) अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात (म.पो.से) तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. हनुमंत गायकवाड, मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, मा.शंकर पांचाळ पोलीस निरीक्षक उमरखेड पो.स्टे. यांचे मार्गदर्शनात/धिरज बांडे, शरद लोहकरे, सफौ मुन्ना आडे, संतोष भोरगे, /तेजाब रणखांब, /सुभाष जाधव, रमेश राठोड, सुनिल पंडागळे,रविंद्र शिरामे, राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.


जिल्हा प्रतिनिधी एस के शब्बीर यवतमाळ

 
 
 

Recent Posts

See All

Comments


bottom of page