*केंद्रीय मंत्री भूपेंद्र सिंग व केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील बेलदार समाजाच्या शिष्टमंडळाची शासकीय बैठक उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर संपन्न* काल दि. 28
- CT India News
- Oct 1, 2024
- 1 min read
*केंद्रीय मंत्री भूपेंद्र सिंग व केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील बेलदार समाजाच्या शिष्टमंडळाची शासकीय बैठक उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर संपन्न*
काल दि. 28 सप्टेंबर रोजी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर, केंद्रीय मंत्री भूपेंद्र सिंग व केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, तथा विजय चौधरी यांच्यासोबत राज्यभरातील बेलदार समाज शिष्टमंडळाची शासकीय बैठक संपन्न झाली.यावेळी बेलदार समाजाचे अध्यक्ष जानकिराम पांडे,विनायकराव सगर,डॉ राजू ताटेवार,बुलढाणा जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम बिलेवार,धनराज चौके,पी.एम भगेवार,राम आचमवाड,बाबुरावजी एनिले रामेश्वर पांडे,,संजय घटे,ईश्वर पांडे,गणेश कलबुर्गी शास्त्री,बापू सगर,गंगाधर गजलवार,दत्तात्रय सगर, भारत मोहिते राहुल पवार,बापू जाधव, कांताराव सगर,मनोज चाकणकर,संतोष कोल्हापुरे,या प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत,90 जणांच्या शिष्टमंडळा सोबत महाराष्ट्रातील बेलदार समाजाच्या वेगवेगळ्या मागण्या संदर्भात चर्चा करण्यात आली त्याच प्रामुख्याने बेलदार समाजाच्या सर्व उपजाती यांना प्रमुख बेलदार जातीच्या दाखल्यासह इतर राज्यांप्रमाणे अनुसूचित जातीचा दर्जा देऊन बेलदार समाजाचे स्वतंत्र,महामंडळ स्थापन करण्यात यावे, प्रत्येक तालुक्याला एनटी, व ओबीसी चे स्वतंत्र वस्तीगृह देण्यात या प्रमुख मागण्या करण्यात आल्या यावर,शासनातर्फे सकारात्मक प्रतिसाद देऊन उचित कार्यवाही करून मागण्या मंजूर करण्यासाठी शासन कटिबद्ध राहील असे आश्वासन देण्यात आले,व उपमुख्यमंत्री कार्यालयातर्फे सर्व शिष्टमंडळासाठी शासकीय स्नेहभोज आयोजन करण्यात आले
सीटी इंडिया न्यूज साठी ओमकार पोतलवाड









Comments