top of page

खमारी - बुटी मार्गावरील पुलाचे बांधकाम थंड बस्त्यात.. सार्वजनिक बांधकाम विभाग भंडारा कुंभकर्णी झोपेत...!! संतत धार पावसाने मार्ग बंद...!! भंडारा सार्वजनिक विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष....?? भंडारा:-

  • Writer: CT India News
    CT India News
  • Sep 11, 2024
  • 2 min read

खमारी - बुटी मार्गावरील पुलाचे बांधकाम थंड बस्त्यात..

सार्वजनिक बांधकाम विभाग भंडारा कुंभकर्णी झोपेत...!!


संतत धार पावसाने मार्ग बंद...!!


भंडारा सार्वजनिक विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष....??



भंडारा:- भंडारा जिल्ह्यातील खामरी /बुटी मार्गावरील नाला बांधकाम करण्या करीता 40 वर्षाचा कालावधी लोटून त्या मुळे तो नाला खोलवर गेला असून त्या नाल्याच अद्यापही बांधकाम करण्यात आले नाही, 10सप्टेंबर ला पाऊसाने हजेरी लावली असता बुटी मार्गावरील पुलावरील वाहतूक ठप्प झाली होती,तो नाला खोलवर भागात असल्याने जाणे येणे बंद झाले, खमारी बुटी मार्ग हा मुख्य मार्ग असून तो मार्ग करडी, तुमसर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात जोडलेला असून मुख्य म्हणजे बाजार पेटे,शासकीय रुग्णालय, रेल्वे स्टेशन तुमसर,पंचायत समिती भंडारा, तसेच हा मार्ग 25 गावांना जोडलेला असून या मार्गाने रहदारीचा मmमुख्य मार्ग ठरतो, खमा बुटी मार्गांवरील नाला हा पावसाळ्यात डोकेदुखी ठरत असतो, पावसाळ्यात त्या पुलावरून जाणे म्हणजे जीव धोक्यात घालून जाणे, तारेवरची कसरतच करावी लागते, येथील स्थानिक लोकप्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभाग कुंभकर्णी झोपेत असताना दिसुन येतात, नुसते खुर्चीवर बसून कागदी घोडे नाचवत असतात सार्वजनिक बांधकाम विभाग भंडारा, आणि त्या पुलियांची दैनावसता खराब होऊ लागली असून सार्वजनिक बांधकाम विभागातील संबंधित अधिकारी यांनी सदर नाला खोलवर गेला असून त्या नाल्यांचे तातडीने बांधकाम करण्यात यावे,खमारी बुटी सर्कल चे सदस्य रजनीश बनसोड नी सार्वजनिक बांधकाम विभागाला हजारो दा पत्र पाठवले आहे, परंतू कॉल तर केला असुन पाणी कुठे मुरते तेच कळत नाही, खमारी बुटी नाल्याचे तीस ते च्याळीस वर्षा पासुन अद्यापही बांधकाम करण्यात आला नाही.त्या मार्गावरून वर्धड असून,हजारो नागरिक/वाहन चालक यांची रहदारी सुरू असते. कारधा, सुरेवाडा,मांडवी,खडकी करडी,हा मार्ग तुमसर मार्गाला जोडलेला असून हा मार्ग मुख्य मार्ग आहे,तो मार्ग पावसाळ्यातील जाणे येण्या करीता फारच जून महिन्यात मांडवी,बुटी वरील नाला अवघड ठरत असतो.त्या मार्गाने शासकिय बसेस भंडारा ते करडी,तुमसर,गोंदिया दरोरोज धाव ,वाहन चालक यांची रहदारी सुरू असून तो मार्ग पावसाळ्यातील जाणे येण्या करीता भक्कम डोकेदुखी ठरत असतो, जिल्ह्यातील लोकप्रतनिधींकडून दुर्लक्ष होत असल्याची माहिती तेथील जगदीश बनसोड जिल्हा परीषद सदस्य समाज कल्याण कृषी समिती सध्यक्ष तसेच मांडवी सरपंच शेषराम कांबळे, नलिनी काळे खमारी सरपंच यांची आहे, ग्रामपंचायत मांडवी येथील सरपंच यांनी कित्येकदा मुख्य कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग भंडारा नाल्याचे तातडीने बांधकाम करण्यात यावे या संबंधित तेथील स्थानिक अधिकारी यांना हजारो तक्रारी दिले, सार्वजनिक बांधकाम विभाग आराम से मस्त कुंभकर्णी नींद से आराम कर रहे है,

नाला हा तीस ते च्याळीस वर्षा पासुन अद्यापही बांधकाम करण्यात आला नाही.त्या मार्गावरून वर्धड असून,हजारो नागरिक/वाहन चालक यांची रहदारी सुरू असते. कारधा, सुरेवाडा,मांडवी,खडकी करडी,हा मार्ग तुमसर मार्गाला जोडलेला असून हा मार्ग मुख्य मार्ग आहे,तो मार्ग पावसाळ्यातील जाणे येण्या करीता फारच जून महिन्यात मांडवी,बुटी वरील नाला अवघड ठरत असतो.त्या मार्गाने शासकिय बसेस दर दिवसा धावत असतात, सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने बांधकाम करावे अशी माहिती स्थानिक पातळीवरील रजनीश बंसोड जिल्हा परिषद सदस्य खमारी बुटी सर्कल, तसेच खमारी येथील सरपंच नलिनी काळे, शेसराम कांबळे सरपंच मांडवी,तसेच स्थानीक नागरिकांची, वाहनचालकांची आहे.



भंडारा उपसंपादक अनिल ढोलवार

 
 
 

Recent Posts

See All

Comments


bottom of page