*खिंडसी जलाशयाचे पाणी शेतकऱ्यांना सिंचनाकरिता पुरवठा करण्याबाबत स्वाभिमानी संघर्ष समितीचे एसडीओंना निवेदन* खिंडसी जलाशयात ज्या गावातील शेती गेली तेच शेतकरी ओलितापासून वंचित आहेत व पाण्याच्या काठावर अस
- CT India News
- Aug 14, 2024
- 1 min read
*खिंडसी जलाशयाचे पाणी शेतकऱ्यांना सिंचनाकरिता पुरवठा करण्याबाबत स्वाभिमानी संघर्ष समितीचे एसडीओंना निवेदन*
खिंडसी जलाशयात ज्या गावातील शेती गेली तेच शेतकरी ओलितापासून वंचित आहेत व पाण्याच्या काठावर असून कोरडवाहूमुळे दुष्काळाने होरपडत आहेत व जनावरांना पाणी,चारा तसेच पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहण्याचे दुर्दैव आहे शेतकऱ्या चां नशिबी आले आहे. यासंबंधी खूप वर्षापासून स्थानिक शेतकरी पाण्याकरिता मागणी करत आहे परंतु प्रशासनाला जाग येत नसल्याचे स्थानिक शेतकऱ्यांना कळल्यानंतर त्यांनी स्वाभिमानी संघर्ष समितीकडे धाव घेतली व त्यांच्या या समस्यांचे निराकरण करण्यासाठी स्वाभिमानी संघर्ष समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याकरिता पुढाकार घेतला. खिंडसी जलाशयाच्या पूर्व,उत्तर व दक्षिण दिशेस असणाऱ्या महादुला, पंचाळा, मांद्री ,घोगरा, मुसेवाडी, गुडेगाव, भंडारबोडी, शिवनी, किरणापुर, ईसापुर, इत्यादी गावे सिंचना अभावी वंचित राहिलेली आहे. हा विचार होणे गरजेचे आहे. म्हणूनच हा गंभीर विषय मार्गी लावण्याकरिता स्वाभिमानी संघर्ष समितीचे अध्यक्ष मा. सुरेशजी वांदिले साहेब यांच्या नेतृत्वात आज दिनांक 13/08 /2024 ला मा. उपविभागीय अधिकारी साहेब रामटेक यांना निवेदन देण्यात आले. सदर प्रसंगी स्वाभिमानी संघर्ष समितीचे उपाध्यक्ष अनिलजी मुलमुले, सचिव सेवकजी बेलसरे,तालुकाध्यक्ष अमितजी बादुले, विनायकजी महाजन, नरेंद्रजी डहरवाल, गोपालजी काठोके, धनराजजी झाडे,मनोहरजी दियेवार, रामलालजी वैद्य, संजयजी साकुरे, अर्जुनजी बावनकर, सुरेशजी बागडे, मनोहरजी बरबटे, संतोषजी डोहाळे, बंडूजी रामटेके तसेच इतर पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते Ct India news साठी तालुका प्रतिनिधी राहुल हटवार











Comments