*डोंगरगाव येथील कुमारी प्रज्ञा दुसानेला श्रद्धांजली : बिलोलीत विद्यार्थ्यांसोबत दोन मिनिटे शांतता पाळली* सगरोळी / प्रतिनिधी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगरगाव येथे तीन वर्षांच्या कुमारी प
- CT India News
- 2 hours ago
- 1 min read
*डोंगरगाव येथील कुमारी प्रज्ञा दुसानेला श्रद्धांजली : बिलोलीत विद्यार्थ्यांसोबत दोन मिनिटे शांतता पाळली*
सगरोळी / प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगरगाव येथे तीन वर्षांच्या कुमारी प्रज्ञा जगदीश दुसाने हिला झालेल्या अमानुष अत्याचार व निर्घृण हत्येने संपूर्ण समाज हादरून गेला आहे. या निरपराध बालिकेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बिलोली शहरातील नवरत्न गल्ली येथे बाल मुली, विद्यार्थी, पालक यांनी एकत्र येत शोकसभा आयोजित केली.कार्यक्रमात साईनाथ खंडेराय यांनी उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनींना हा दुर्दैवी प्रकार समजावून सांगत सतर्कता, सुरक्षितता आणि स्वतःचे रक्षण करण्याबाबत मार्गदर्शन केले. मुलांनी कोणत्याही प्रकारच्या संशयास्पद किंवा धोकादायक परिस्थितीची तात्काळ पालकांना किंवा शिक्षकांना माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.सभेच्या शेवटी सर्वांनी दोन मिनिटे शांतता पाळून कुमारी प्रज्ञा दुसाने हिच्या आत्म्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर मुलांना शाळेकडे रवाना करण्यात आले.
प्रतिनिधी
ः नंदकुमार स्वामी बडूरकर✍️









Comments