गुंज सवना/ऊसतोड करण्यासाठी एक रूपया सुध्दा देऊ नका - बि. बी.ठोबंरे
- CT India News
- Oct 28
- 2 min read
गुंज सवना/ऊसतोड करण्यासाठी एक रूपया सुध्दा देऊ नका - बि. बी.ठोबंरे
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना माझे कळकळीचे आव्हान व विनंती आहे की यावर्षीच्या ऊस गाळप हंगामात तुमच्या कडे ऊस मजुरांकडून किंवा हार्वेस्टिंग मशीन चालकांकडून पैशाची मागणी झाल्यास एक रुपया तर सोडाच फडावर नारळ सुध्दा फोडु नका तुमच्या संपूर्ण ऊसाची जबाबदारी ही आमची आहे तो आम्ही गाळपासाठी नेऊ ऊस तोडणी करतांना भेदभाव करुन मागेपुढे केल्यास संबंधितांवर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात येईल अशी सत्क ताकीद आजच्या गव्हान पुजन कार्यक्रम प्रसंगी आपल्या आध्यक्षीय भाषनात कारखाण्याचे व चेअरमन तथा सर्वेसर्वा कृषीरत्न श्री बि बी ठोंबरे यांनी सांगितले मागीलवर्षी शासनाने तोडणी वाहतूक दरात तब्बल ३३टक्के भरीव आशी वाढ केलेली आहे त्यामुळे तोडणी वाहतूक मजुरांकडून ऊत्पादंकाची कोणत्याही परिस्थितीत पिळवणूक खपुन घेतली जानार नाही तोडणी वाहतूक दराची एकंदरीत रक्कम ही एफ आर पी मधुनच दिली जाते तरीपण जेवणाच्या चहापाणी किंवा बक्षीसाच्या नावाखाली मजुर व वाहतुक ठेकेदाराकडून आर्थिक पिळवणूक केली जाते मागीलवर्षी च्या गळीत हंगामात आशा प्रकारच्या आनेक तक्रारी माझ्याकडे आल्या पंरतु या हंगामात आशा कोणत्याही व्यत्कीची गय केली जानार नाही या गळीत हंगामात आठ हजार हेक्टर ऊसाची नोंद करण्यात आली आसुन सात लाख गाळपाचे ऊद्दीष्ट ठेउन तसे नियोजन करण्यात आले आहे मागील वर्षीच्या गळीत हंगामात सर्वात जास्त ऊस पुरवठा करणारे शेतकरी पिपंळखुटा येथील नानाराव जाधव व त्यांच्या सौभाग्यवती यांना यावर्षीचा पुजेचा मान देण्यात आला तर मागील हंगामात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गाडीवान, वाहतूक ठेकेदार,आधीकारी, कर्मचारी यांना सन्मानित करुन रोख बक्षीस देण्यात आले हा दहावा गळीत हंगाम यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व नियोजन करण्यात आले आहे सर्वानी आपला संपूर्ण ऊस आपल्या कारखान्यास पुरवठा करुन सहकार्य ठेवावे विदर्भात सर्वाधिक ऊस दर देण्याची पंरपरा आम्ही यावेळी सुध्दा कायम ठेऊ याबाबत आपन निश्चितं राहावे तसेच युनिट दोन चा सीएनजी प्रकल्प लवकरच कार्यान्वित करु याची सुरुवात म्हणून पुसद येथील दयाराम जाधव व महागाव येथील संजय नरवाडे यांच्या सौभाग्यवती या दोन शेतकऱ्यांना सीएनजी पंपाचे परवाने यावेळी देण्यात आले नॅचरल परीवार हा शेतकरी व कामगार यांचे हीताला प्रथम प्राधान्य देणारा एकमेव ग्रुप आहे त्यामुळे याला आम्ही एक परीवार संबोधले आहे यावेळी एन साई बॅकेचे संचालक जनरल मॅनेजर कदम साहेब कृषीभूषण पांडुरंग आबा आव्हाड चितांगराव कदम,नानाराव जाधव व त्यांच्या सौभाग्यवती इत्यादी व्यासपिठावर उपस्थित होते परीसरातील विविध संस्थानचे अध्यक्ष पदाधिकारी ऊस उत्पादक शेतकरी ठेकेदार,आधीकारी, कर्मचारी, पत्रकार यांचे सर्वाचे हस्ते गव्हानीत ऊस मोळी टाकून व ऊस बैलगाडी पुजन करुन गाळप हंगामाचा शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक पांडुरंग आबा आव्हाड यांनी केले तर आभार एन साई बॅकेचे अध्यक्ष यांनी केले उपस्थित शेतकरी सु. ना. माजी संचालक साहेबराव ठेंगे. शिवाजी देशमुख. विशाल पवार. गोविंदराव देशमुख. सवनेकर.अविनाश भांगे. करंजखेड. अनंतराव देशमुख.गोविंदराव शिंदे. मंचक राव देशमुख. मंचकराव गोरे. टीकाराम कदम. एमडी मिराशे. इत्यादी मान्यवर उपस्थित होते
तालुका प्रतिनिधी दीपमाला धुर्वे महागांव











Comments