top of page

छत्रपती संभाजीनगरचा बनावट नोटा तयार करणारा कारखाना उघड…

  • Writer: CT India News
    CT India News
  • Aug 3
  • 1 min read

छत्रपती संभाजीनगरचा बनावट नोटा तयार करणारा कारखाना उघड…

पोलिसांनी बनावट नोटा तयार तयार होतील, असा कागद, आधुनिक छपाई यंत्र असा एकूण ८८ लाख २० हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे,

अहिल्यानगर : बनावट नोटा तयार करणारा छत्रपती संभाजीनगर शहराजवळील कारखाना व या बनावट नोटा बाजारात वितरित करणारे रॅकेट अहिल्यानगर तालुका पोलिसांनी उघडकीस आणले आहे. एकूण ७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र मुख्य सूत्रधार फरार झाला. पोलिसांनी ५९ लाख ५० हजार रुपये रुपयांच्या ५०० दराच्या बनावटांसह २ कोटी १६ लाख रुपयाच्या बनावट नोटा तयार तयार होतील, असा कागद, आधुनिक छपाई यंत्र असा एकूण ८८ लाख २० हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे

जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आज, शुक्रवारी या कारवाईची माहिती दिली. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, तपासी अधिकारी नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक प्रल्हाद गीते आदी यावेळी उपस्थित होते.


निखिल शिवाजी गांगर्डे (वय २७, कोंभळी, ता. कर्जत), सोमनाथ माणिक शिंदे (वय २५, तपोवन रस्ता, अहिल्यानगर), प्रदीप संजय कापरे ( वय २८, तिंतरवणी, शिरूर कासार, बीड), मंगेश पंढरी शिरसाठ (वय ४०, शिवाजीनगर, छत्रपती संभाजीनगर), विनोद दामोदर अरबट (वय ५३, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर), आकाश बनसोडे (वय २७, निसर्ग कॉलनी, पेठेनगर छत्रपती संभाजीनगर) व अनिल सुधाकर पवार (वय ३६, मुकुंदनगर, छत्रपती संभाजीनगर) या ७ जणांना अटक करण्यात आली आहे तर मुख्य सूत्रधार अंबादास रामभाऊ ससाने (रा. शहरटाकळी, शेवगाव, अहिल्यानगर) हा फरार आहे

 
 
 

Recent Posts

See All

Comments


bottom of page