top of page

जांबूत येथे बिबट्याची दहशत! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

  • Writer: CT India News
    CT India News
  • Aug 12, 2024
  • 2 min read

जांबूत येथे बिबट्याची दहशत!


नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.




जांबूत: (ता. शिरूर) येथे बिबट्याकडून पशुधनावरील हल्ले वाढत आहेत. दिवसाही बिबटे शेतकरी वर्गांना पाहावयास मिळत आहे. त्यामुळे दिवसा रानामध्ये काम करायला शेतकरी घाबरत आहे. पाळीव प्राणी बिबट्याच्या भक्षस्थानी या घटना नवीन नाहित. पण बिबट्यांचा झालेला सुळसुळाट यामुळे मानवाला जीव गमवावा लागत आहे. अंगणात, रस्त्यावर, शेतात दबा धरून बसलेला बिबट्या सहजतेने मानवाची शिकार करत आहे.

बिबट्याचा बंदोबस्त करण्याचा मुख्य प्रश्न सुटला पाहिजे.मात्र, वनविभाग पंचनाम्यावरून ‘नुकसान भरपाई’ या नावाखाली प्राण्यांसारखा मानवाच्या जीवाचा सौदा करू लागला आहे. शेतासाठी विज दिवसा किंवा रात्री यामुळे बिबट्यांच्या हल्ल्याचा प्रश्न सुटणार आहे काय? !शिरूर, आंबेगाव, जुन्नर व खेड या तालुक्यात बिबट्याची दहशत वाढली आहे. शिरूर तालुक्यात मानवावर हल्ला होण्याची घटना अधिक झाल्या आहेत.त्यामुळे रात्रीत होणाऱ्या बिबट हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी वन विभागाने सतर्क राहून ठिकठिकाणी पिंजरे लावले पाहिजे.

सवाल जाणकारांचा ?घटना घडल्यानंतर वनविभाग बिबट्याचा बंदोबस्त करून त्याला जेरबंद करते. पण या आधी मानवावर किंवा पशुनवर हल्ला झालेला असतो.या बेट भागात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शेतकामासाठी दिवसा विज मिळावी यासाठी आग्रह धरला जातो. हे योग्यही असू शकेल पण शेतीत दिवसा काम करत असताना बिबट्यापासून संरक्षण कोण करणार ? शाळेतील विद्यार्थी, प्रवासी यांचा विचार होऊन नुकसान भरपाई बरोबरच सुरक्षीततेची हमी या बाबत विचार होणे गरजेचे आहे. मानव आणि बिबट यांचा संघर्ष तीव्र होताना दिसत आहे.

जांबूत परिसरात बिबटयांचा वावर जास्त प्रमाणात वाढलेला दिसून येत आहे. जांबूत येथे बिबट्यांचे पशुधनावरील हल्ले हे सतत वाढत आहेत. दररोज कुठे ना कुठे पाळीव पशू व प्राण्यांवर हल्ले होताना दिसत आहे. तसेच त्याचे दर्शन दिवसाही होऊ लागले आहे, यामुळे त्यांचा बंदोबस्त करणे खूप गरजेचे आहे. बिबट्याला भक्ष भेटले नाहीतर मनुष्यावर हल्ला करायलाही तो मागेपुढे पाहणार नाही. लोकांना जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. मेंढपाळ, शेतकरी,लहान मुले महिलांमध्ये कमालीची असुरक्षितेची भीती निर्माण झाली आहे.


प्रतिनिधी : शुभम वाकचौरे

 
 
 

Recent Posts

See All

Comments


bottom of page