त्या कंत्राटदारावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदवा बहुजन समाजाने केली राज्यपालांकडे मागणी देऊळगाव राजा : बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवित येथील
- CT India News
- Aug 31, 2024
- 1 min read
त्या कंत्राटदारावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदवा
बहुजन समाजाने केली राज्यपालांकडे मागणी
देऊळगाव राजा : बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवित येथील बहुजन समाजाने संबंधित कंत्राटदार व पीडब्ल्यूडी च्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्याविरुद्ध रासुका अंतर्गत राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे.
तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याकडे दिलेल्या या निवेदना द्वारे बहुजन समाजाने म्हटले आहे की, महाराष्ट्राची अस्मिता,बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची मालवण च्या राजकोट किल्ल्यावर झालेल्या विटंबनेने बहुजन समाज स्वस्त झाला असून समाजातून संतप्त भावना व्यक्त होत आहे.महाराजांचा पुतळा कोसळल्याने सबंध महाराष्ट्रातील शिवप्रेमी मध्ये असंतोषाची लाट पसरली आहे. कोट्यावधींचा निधी खर्चून बांधलेला पुतळ्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याने महाराजांचा पुतळा कोसळला.ही घटना महाराष्ट्रा विरुद्ध एक षडयंत्र असल्याचा आरोप करीत पुतळा उभारणारा कंत्राटदार व संबंधित भ्रष्ट अधिकारी यांची चौकशी करून त्यांच्याविरुद्ध तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी करण्यात आली. निवेदन देताना प्रदीप हिवाळे, मुशीरखान कोटकर, सुनील शेजुळकर, राजू नाडे, आकाश कासारे,ॲड.राजू मान्टे,आदिल पठाण, निलेश गीते,आकीब कोटकर, लखन लोखंडे,मधुकर तांबे, विठ्ठल पन्नासे, आकाश साळवे, नाझीम मिर्झा,संदीप गायकवाड आदींची उपस्थिती होती.









Comments