दौलतराव निकम विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम असे उदगार सेवानिवृत्त हवलदार,निर्भया पथकाचे पोलीस अधिकारी पांडुरंग पडवळे यांनी केले. ते श्री दौलतराव निकम माध्यमिक विद्यालयात रक्षाबंधन कार्यक्रम प्रसंगी बोलत
- CT India News
- Aug 20, 2024
- 1 min read
दौलतराव निकम विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम असे उदगार सेवानिवृत्त हवलदार,निर्भया पथकाचे पोलीस अधिकारी पांडुरंग पडवळे यांनी केले. ते श्री दौलतराव निकम माध्यमिक विद्यालयात रक्षाबंधन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.जी.पोवार होते.
श्री पडवळे पुढे म्हणाले,श्री दौलतराव निकम विद्यालयाने गेली तीस वर्षे सेनेत भरती झालेल्या सर्व जवानांना संबंधित पत्त्यावर राखी पाठवून जवानांचा आदर केला आहे. जवान महादेव हजारे यांनी सैनिकी विविध अनुभवांचे कथन केले.जवान शहाजी निकम यांनी शालेय जीवनातच सेनेत जायचे निश्चित केल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी देश सेवेसाठी सदैव तत्पर रहावे असे आवाहन केले.जवान दत्तात्रय बोराटे यांनी वरिष्ठांचा आदर, शिस्त व वेळापत्रकाचे पालन सेनेमध्ये पाळणे बंधनकारक असल्याचे सांगून आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा वापर करावा असे सांगितले. यावेळी प्रशालेच्या स्काऊट गाईड व एनसीसीच्या मुलींनी पाहुण्यांना राख्या बांधल्या.
याप्रसंगी प्राथमिक शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनायक लोंढे व उपाध्यक्ष रूपाली निकम यांचा सत्कार करण्यात आला.
या समारंभास जवान सनी खापणे,अतुल खापणे,आकाश कांबळे,किरण निकम व श्रीधर पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक बी.जी.बोराटे यांनी केले सूत्रसंचालन एम.जे.खोत यांनी केले तर आभार एस.आर.गुरव यांनी मानले. (सीटी न्युज इंडिया प्रतिनिधी डाॕ.अशोक पोवार कागल)









Comments