*नागपूरच्या हिंदी वृत्तपत्राचे संपादक (पत्रकार) याची थेट कारागृहात रवानगी* नागपुर येथील हिंदी वृत्तपत्राचे संपादक सुनील सुकलाल हजारी वय ४४ वर्षे यांच्या जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.त्यामुळे त्यां
- CT India News
- Sep 3, 2024
- 1 min read
*नागपूरच्या हिंदी वृत्तपत्राचे संपादक (पत्रकार) याची थेट कारागृहात रवानगी*
नागपुर येथील हिंदी वृत्तपत्राचे संपादक सुनील सुकलाल हजारी वय ४४ वर्षे यांच्या जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.त्यामुळे त्यांची रवानगी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात झाली.आरटीओ एजंट कडून खंडणी मागितल्या प्रकरणी पत्रकार सुनील हजारी यांना सदर पोलिसांनी रंगात अटक केली होती.
आरोपी नामवंत हिंदी वृत्तपत्राचा संपादक म्हणून काम करतो.सुनील हजारी याला १ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.पोलीस कोटढी वाढवण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात अर्ज केला असून एमसीआर लावण्यात आला.या दरम्यान आरोपी हजारी यांच्या वकिलांनी न्यायालयात जमीन अर्ज केला होता मात्र न्यायालयाने त्यांच्या जमीन अर्ज फेटाळला असून त्याची नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.
आरटीओ एजंट धनराज शर्मा वय ५५ वर्षे यांनी दिलेल्या तक्रारी नुसार पत्रकार हजारी याला खंडणी घेताना अटक करण्यात आली होती.धनराज शर्मा अनेक वर्षापासून ग्रामीण आरटीओ शी जुडला आहे.काही दिवसापूर्वी नागपूर ग्रामीण आरटीओ मधील एका प्रकरणात तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून या प्रकरणात संबंधित शर्माची काय भूमिका आहे याबाबत हजारीने वृत्त प्रकाशित केले होते.याच प्रकरणाच्या बाबतीत वृत्त प्रसिद्ध न करण्याच्या बदल्यात आरोपीने संबंधीत धनराज शर्माला दहा लाखाची मागणी केली होती, मात्र त्यानंतर सात लाखात सौदा झाला.
२८ ऑगस्ट रोजी शर्मा ने त्याला एक लाखाचा पहिला हप्ता दिला होता.मात्र, त्यानंतर पैसे देण्याची इच्छा नसल्याने शर्माने पोलिसात धाव घेतली होती. या प्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली.
उपायुक्त राहुल मदने यांच्या निर्देशनानुसार संबंधीत पोलीस ठाण्याच्या पथकाने सापडा रचला. गुरुवारी आरोपी सुनील हजारी ८० हजार रुपये घेण्यासाठी व्हीसीए स्टेडियम येथे पोहोचला.तिथून दोघे पण एका आईस्क्रीमच्या दुकानात गेले असता पोलिसांनी पैसे घेताना रंगेहाथ त्याला पकडले.या झालेल्या कारवाईमुळे नागपूरच्या संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रात खडबड उडाल्याची चर्चा निदर्शनास येत आहे.त्यामुळे अश्या खंडणी मागणाऱ्या पत्रकारावर नक्कीच चाप बसेल यात काहीच शंका नाही.
प्रतिनिधी राहुल पानतावणे









Comments