top of page

पठाणपुरा परतुर जिल्हा जालना च्या पिडीत परिवाराची नगरपरिषद अधिकारी नी केली दिशाभूल .... कलेक्टर साहेबांना 14/08/2024 तारखेला दिले निवेदन कि , 20 तारखेपर्यंत पिडीत परिवाराला न्याय नाही मिळाला तर 21 ता

  • Writer: CT India News
    CT India News
  • Aug 14, 2024
  • 3 min read

पठाणपुरा परतुर जिल्हा जालना च्या पिडीत परिवाराची नगरपरिषद अधिकारी नी केली दिशाभूल .... कलेक्टर साहेबांना 14/08/2024 तारखेला दिले निवेदन कि , 20 तारखेपर्यंत पिडीत परिवाराला न्याय नाही मिळाला तर 21 तारखेपासुन अन्नपाणी सोडून आमरण उपोषणाचा इशारा ...विषय -1) परतुर नगरपरिषद च्या अधिकारींनी पीडित परिवाराची केली दिशाभूल ..2).न.प. पोलीस प्रोटेक्शन फी 11500 रूपये वापस करावी व कोर्टात केस जिंकले व नगरपरिषद रेकॉर्डवर जमीन आहे, आज पावेतो टॅक्स देऊन देखील जमीन वापस देण्यास नकार 3)राबिया बी व शेख मुसा शेख इसाक च्या नावावरची सर्व जमीन नगर परिषद ने वापस द्यावी...4) कलेक्टर ऑफिसला आपला अधिकार न मिळाल्यास *21ऑगस्ट पासून सबला उत्कर्ष फाउंडेशन द्वारे पीडित परिवार सबला उत्कर्ष फाउंडेशन अध्यक्ष राजश्री चौधरी सोबत करणार आमरण उपोषण ....

*



महोदय नमस्कार!

मी शेख मुसा शेख इसाक पठाणपुरा परतुर जिल्हा जालना भागात राहतो. महोदय जालना मधील परतून पोलीस स्टेशन व नगरपरिषद हद्दीतील रहिवासी शेख मुसा शेख इसाक माझी जमीन माझ्या आईच्या ( रबीया बी.)च्या नावावरून माझ्या नावावर झालेली आहे याची नोंद नगर परिषद रेकॉर्डवर आहे. माझ्या आईची जमीन राबिया बी ची सर्व जमीन चे रजिस्ट्री चे पेपर असून देखील जकीरा शेख व अखिल व शेजारील व्यक्तीने राहणार परतुर ने अवैद्य कब्जा केला इतकेच नव्हे तर कोर्टात जिंकले तरी समोर चे व्यक्ती कानूनच्या नियमांचे उल्लंघन करीत आहेत पोलीस प्रशासन ला पण मानीत नाही म्हणून दिनांक 23 जुलै2024 रोजी सबला उत्कर्ष फाउंडेशन औरंगाबाद अध्यक्ष राजश्री चौधरी सोबत कलेक्टर साहेब जालना यांना भेटून मदतीसाठी निवेदन दिले. एसपी साहेब जालना, तहसीलदार साहेब परतूर, पोलीस स्टेशन परतुर, नगरपरिषद परतुर सर्वांना अर्ज देऊन तक्रार केली होती की माझी परतुर पठाणपुरातील जमीन वर जकिरा शेख व अखिल ने अवैध कब्जा केलेला आहे यामुळे 9 ऑगस्ट 2024 ला पोलीस प्रोटेक्शन देखील घेण्यात आले होते. नगरपरिषदला पोलीस स्टेशन तर्फे एक पत्र गेले होते की मुसा शेख ने अवैध कब्जा हटवण्यासाठी पोलीस प्रोटेक्शन मागितले आहे तर त्या जागेवर किती अधिकारी उपस्थित राहतील तर तहसीलदार ऑफिस कडून नगरपरिषद अधिकारी कडे पत्र आले असता तीन अधिकारी 9 ऑगस्ट 2024 ला अवैध कब्जा हटवण्यासाठी उपस्थित असतील असे पत्र परतुर पोलीस स्टेशनला देण्यात आले परंतु 25 जुलै 2024 ला नगरपरिषद ला सर्व पेपरची झेरॉक्स कॉपी जोडून देण्यात आली होती मग 9 तारखेला नगरपरिषद अधिकारी रवी देशपांडे, श्री.खनपटे व श्री . सातपुते उपस्थित असून त्यांनी परिवाराची दिशाभूल करून फक्त सगळ्या लोकांचे कागदपत्रे जमा करून पंचनामा करून निघून गेले . कब्जा न हटवता शेख मुसा शेख इसाक ला जमीन वापस केली नाही. नगरपरिषद अधिकाऱ्यांना फक्त कागदपत्र जमा करायचे होते तर त्यांनी पोलीस प्रोटेक्शन घेण्यास होकार का दिला? नगरपरिषद अधिकाऱ्यांनी सबला उत्कर्ष फौंडेशन तर्फे 11500 रूपये जे पोलीस कोटेशन फी भरलेली आहे ती त्यांनी वापस करावी कारण की 24 तारखेला जर सर्व पेपर जमा केले होते आणि कब्जा हटवायचा न होता तर पोलीस स्टेशनची फी का भरण्यास सांगितले याचे उत्तर द्यावे यात चुकी कोणाची? पोलीस प्रोटेक्शन फी नगरपरिषद अधिकाऱ्यांनी विनाकारण खर्च केले. गरीब परिवाराकडे पैसे नसल्यामुळे सबला उत्कर्ष फाउंडेशन औरंगाबाद द्वारा त्यांची पोलीस स्टेशन फी भरण्यात आलेली होती ती देखील नगरपरिषद अधिकाऱ्यांकडून सबला उत्कर्ष फाउंडेशन चे 11500/- रुपये पोलीस प्रोटेक्शन फी वापस करावी. नगरपरिषद परतून अधिकारी करतात काय असा प्रश्न उद्भवला आहे पोलीस प्रोटेक्शन फक्त कब्जा हटवण्याचा उल्लेख तक्रार वर केलेला होता तर यांनी त्यांचा अधिकार का नाही मिळवून दिला जेव्हा पीडित परिवार कडे रजिस्ट्री चे पेपर कोर्टाने पण शेख मुसा शेख इसाक कडून निकाल दिला, नगरपरिषद रेकॉर्ड असून आज पावोतो नगरपरिषद चा टॅक्स देखील भरत आलेले आहेत. तरी देखील त्यांना त्यांच्या जमिनीपासून वंचित ठेवण्यात आले . नगरपरिषद अधिकारी उडवा उडवी चे उत्तर देत आहेत त्यामुळे आम्हाला वाटत नाही की आमची जमीन आम्हाला वापस मिळेल . उलट समोरचे पार्टीचे लोक दबंग असून हमेशा आमच्यावरच मारपीठ केली जाते याची तक्रार देखील एसपी ऑफिस जालना, उपपोलीस अधीक्षक परतुर , पोलीस स्टेशन परतुर सर्वांना तक्रार दिलेली आहे. महोदय माझी आई राबिया बी. च्या नावावर नगरपरिषद रेकॉर्डला जितकी पण जमीन आहे आमची पूर्ण जमीन आम्हाला लवकरात लवकर वापीस मिळावी. कलेक्टर साहेब 20 ऑगस्ट 2024 पर्यंत जर आमची जमीन आम्हाला वापस मिळाली नाही तर 21 ऑगस्ट 2024 पासून सबला उत्कर्ष फाउंडेशन औरंगाबाद द्वारा पिडीत शेख मुसा शेख इसाक राहणार परतुर व श्रीमती राजश्री राहुल चौधरी सबला उत्कर्ष वृत्तपत्र मुख्य संपादक दिल्ली & महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई संपर्क प्रमुख दिल्ली , अध्यक्ष सबला उत्कर्ष फाऊंडेशन औरंगाबाद आमरण उपोषण ला कलेक्टर ऑफिसला बसू .व 21 तारखेच्या आमरण उपोषणाला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ चे सर्व 250 सदस्य पत्रकार बांधव जालना समर्थन देतील. जोपर्यंत या गरीब परिवारांची जमीन वापीस मिळत नाही तो पावोतो. कलेक्टर साहेबांना निवेदन आहे की लवकरात लवकर गरीब परिवाराची मदत करावी व नगरपरिषद परतुर अधिकारी व कर्मचारी ची चौकशी करून योग्य ती कारवाई लवकरात लवकर करावी ही विनंती! आम्ही जर अन्न पाणी सोडले आणि आमच्या जिवांचे बरेवाईट झाले तर त्याचे जवाबदार प्रशासन राहील . असे निवेदन जालना जिल्हाधिकारी साहेब यांना श्रीमती राजश्री चौधरी सबला उत्कर्ष फाउंडेशन, पिडीत मूसा शेख, शेख सलीम, सैयद अहमद, अफरोज खान, हफीज खान उपस्थित राहुन दिले जिलाधिकारी साहेबांनी लेटर जारी करतो व पिडीत परिवाराला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

 
 
 

Recent Posts

See All

Comments


bottom of page