बोरगाव भराडी येथील कन्या बनली वेदनादायी परिस्थिती वकिल... वयाच्या 17 व्या वर्षी संभाजीनगर गाठले..
- CT India News
- Oct 28
- 2 min read
बोरगाव भराडी येथील कन्या बनली वेदनादायी परिस्थिती वकिल...
वयाच्या 17 व्या वर्षी संभाजीनगर गाठले.. परिस्थिती अतिशय हलाकीची असल्यामुळे काम केल्याशिवाय शिक्षण पूर्ण होऊ शकत नाही हे समजल्यानंतर मिळेल ते काम करण्यास सुरुवात केली त्यानंतर शहरांमध्ये आल्यानंतर कोणाशी ओळख नसल्यामुळे कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यावा हे समजत नव्हतं अशातच कलेक्टर साहेबांच्या बंगल्या पाठीमागे गव्हर्मेंट कॉलेज व तेथेच मुलींची राहण्याचे होस्टेलचे सोय होईल याची माहिती मिळाली म्हणून त्या कॉलेजला ऍडमिशन घेतलं व अभ्यास सुरुवात केली.. बारावीला सिल्लोड तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाल्यामुळे अनेक मान्यवरांकडून शिष्यवृत्ती मिळाली त्या मिळालेल्या पैशात काही दिवस काढले परंतु नंतर पैशाची चंनचन सुरू झाले म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि तीन वर्षाचे पदवी अतिशय वेदनादायी परिस्थितीत केली नंतर समाजासाठी काहीतरी करण्याचे तळमळ असल्यामुळे 2021 मध्ये लाईफ केअर फाउंडेशन या संस्थेची स्थापना करून माझ्यासारख्या गरजवंत व बेसारा बेवारस व रस्त्यावरील लोकांना मदत करण्यास सुरुवात केली. ही सुरुवात करत असताना कुठेतरी वाटायचं आपण ज्या महिलांना न्याय मिळत नाही ज्या लोकांकडे पैसे अभावी कोर्टामध्ये जाऊ शकत नाही म्हणून आता वकील बनायचं एक स्वप्न मनाशी बाळगून मी अमरावती पंजाबराव देशमुख कॉलेज येथे वकील होण्यासाठी ऍडमिशन घेतलं आणि अभ्यासाची सुरुवात केली पुन्हा एकदा आयुष्यात जुनीच आठवण नव्याने समोर आली ते म्हणजे पैशाचे चंनचन अमरावती म्हणजे माझ्या परिवारातील मी पहिली मुलगी जी शिक्षणासाठी इतक्या दुर आली होती.. अमरावती शहरात मिळेल ते काम करून उप जीविका भागवून कॉलेजची फीस होस्टेलचे भाडे व मेसचे डब्बा याचा देखील खूप मोठा प्रॉब्लेम होता परंतु मिळेल ते काम करून पुन्हा हा संघर्षमय प्रवास मी पूर्ण करू शकले या सर्व धावपळीत पुन्हा समाजसेवेची आवड असल्यामुळे गरजवंत व्यक्तीला अमरावती सारख्या सरकारी हॉस्पिटल मध्ये जाऊन वेळोवेळी मदत केले आणि या सर्व संस्थेच्या सर्व सदस्याने माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून मला योग्य वेळी धीर देत राहिले. म्हणून मी आज वकील झाले माझ्या या यशाच्या पाठीमागे कळत नकळत ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केले त्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते
*ॲड.कल्पना संजय बलरावत*
*अध्यक्षा.लाईफ केअर* *फाऊंडेशन*
*अनाथ आश्रम सेवा केंद्र*









Comments