"भारतीय संविधान" विषयावर देगलूर महाविद्यालयात मार्गदर्शन --- स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा उपक्रम ------- देगलूर : आजचा प्रत्येक विद्यार्थी उद्याचा भारताचा आदर्श नागरिक आहे. एखादा देश ,राष्ट
- CT India News
- Sep 4, 2024
- 1 min read
"भारतीय संविधान" विषयावर देगलूर महाविद्यालयात मार्गदर्शन
---
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा उपक्रम
-------
देगलूर :
आजचा प्रत्येक विद्यार्थी उद्याचा भारताचा आदर्श नागरिक आहे. एखादा देश ,राष्ट्र चालवण्यासाठी आखून दिलेले मूळ आदर्श नियमांचा संचय "संविधान" आहे.या आदर्श मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी नियमाचे पालन करणे गरजेचे आहे असे मत देगलूर महाविद्यालयातील राज्यशास्त्राचे प्रा.डॉ.माधव चोले यांनी व्यक्त केले.
ते येथील आडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागात आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अंतर्गत "भारताचे संविधान" या विषयावर व्याख्यान देत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मोहन खताळ होते.
प्रारंभी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. उत्तमकुमार कांबळे यांनी प्रास्ताविकात महाविद्यालया च्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाविषयी माहिती दिली.
इयत्ता अकरावी व बारावीच्या सर्व शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी विविध स्पर्धा परीक्षेची उच्च माध्यमिक स्तरावरून माहिती व्हावी यासाठी विशेष मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात येते.
याअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी स्पर्धा परिक्षेसाठी "भारतीय संविधान"
हा विषय व्याख्यानाचा होता.
प्रा.चोले यांनी संविधान, मुलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्वे,नागरिकांची कर्तव्य यावर प्रकाश टाकून संविधानातील कोणता भाग परीक्षेत विचारला जाऊ शकतो या विषयी माहिती दिली
अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ.मोहन खताळ यांनी केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डाॅ.धनराज लझडे,तर आभार प्रा.रत्नाकर चिद्रावार यांनी केले यावेळी उपप्राचार्य डॉ.अनिल चिद्रावार, पर्यवेक्षक प्रा.एस एन.पाटील, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन समिती सदस्य,शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
देगलूर तालुका प्रतिनिधी.
चंद्रकांत गज्जलवार वळगकर.









Comments