top of page

महागांव/ नगरवाडी शेतशिवारात गांजा अंमली पदार्थ ची लागवड करणा-या इसमांवर NDPS कायदया अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई दिनांक 14/10/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ कॅम्प पुसद य

  • Writer: CT India News
    CT India News
  • Oct 15
  • 2 min read

महागांव/ नगरवाडी शेतशिवारात गांजा अंमली पदार्थ ची लागवड करणा-या इसमांवर NDPS कायदया अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई


दिनांक 14/10/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ कॅम्प पुसद यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि, मौजे नगरवाडी ता. महागांव येथील इसम नामे-गजानन नारायण मेटकर हा त्याचे नगरवाडी शेतशिवारातील शेत सर्वे नं 12/01 यामध्ये गांजा अंमली पदार्थ झाडांची शेती करीत असताना गांजाची लागवड अमली पदार्थ अशी गोपनीये माहीती मिळाल्याने संदर्भात प्राप्त माहिती वरुन पथकाने तात्काळ वरिष्ठांना या बाबत अवगत करुन मौजे नगरवाडी येथील शेत सर्वे नंबर 12/01 मध्ये जावून इसम नामे-गजानन नारायण मेटकर यांस ताब्यात घेवून पंचा समक्ष त्यांच्या ताब्यातील शेताची पाहणी केली असता सदर शेतामध्ये एकूण 31 लहान मोठ्या आकाराची एकूण 37 किलो 500 ग्रॅम वजनांची गांजा अंमली पदार्थ झाडे आढळून आली




गांजा अमली पदार्थ असा एकूण मुद्देमाल 1,87,500/- रु मिळून आल्याने ते जप्त करुन ताब्यात घेवून इसम नामे-गजानन नारायण मेटकर वय 50 वर्ष रा.नगरवाडी ता.महागांव जि. यवतमाळ यांच्या विरुध्द महागांव पोलीस स्टेशन येथे गुंगीकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनिय (NDPS) कलम 8 (ब), 20(b), (i) अन्वये अपराध क्रमांक 520/2025 प्रमाणे गुन्हा नोंदीसह कार्यवाही करण्यात आली आहे.





स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ ही अवैध धंदे, शस्त्र बाळगणा-या, गुन्हे उघड करणे तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी चे उच्चटन करण्यास प्रतिबध्द असुन यापुढे यासंबंधी माहिती असल्यास सदरची माहिती जनतेने पोलीसाची कोणतीही भिती मनात न बाळगता पुरवावी व पोलीसांना सहकार्य करावे ही विनंती.


सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा. अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात (म.पो.से) सा तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. हनुमंत गायकवाड सा, मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, पोलीस निरीक्षक श्री. धनराज निळे पोलीस स्टेशन महागांव, यांचे मार्गदर्शनात सपोनि/धिरज बांडे, पोउपनि शरद लोहकरे, सफौ/मुन्ना आडे, पोहवा/संतोष भोरगे, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा/कुणाल मुंडोकार, पोहवा रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, चापोउपनि रविंद्र श्रीरामे, पोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.



यवतमाळ प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव

 
 
 

Recent Posts

See All

Comments


bottom of page