top of page

महागांव/तोतया नायब तहसीलदाराने घातला ३३हजाराने गंडा

  • Writer: CT India News
    CT India News
  • Feb 10
  • 1 min read

महागांव/तोतया नायब तहसीलदाराने घातला ३३हजाराने गंडा



महागांव

नायब तहसीलदार बनुन आलेल्या इसमाने शहरातील किराणा ,भांडे व्यावसायिक व आचारी यांना हजारो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार दि.७फेब्रुवारी रोजी उघडकीस आला.

महागाव शहरातील किराणा दुकानावर एक इसम दुपारी एक वाजताच्या दरम्यान येवून आपले नाव देशमुख असुन आजच महागाव तहसिल कार्यालयात नायब तहसीलदार म्हणुन रुजु झाल्याचे सांगत आपल्याकडे लग्न समारंभ असुन त्याकरिता किराणा साहित्य पाहिजे असल्याचा बहाना करून त्यांच्याकडून काजु,बदाम,अंजीर, पिस्ता असा रोख रक्कम १८हजार रुपयांचे किराणा सामान ,भांडे विक्रेत्यांकडून एक मिक्सर किंमत२५००रू.तसेच इंदिरा नगर मधील आचारी नारायण लक्ष्मण कोल्हे यांच्याकडून रोख रक्कम ११,६००रू,११००रू.किमतीचा मोबाईल असा सर्व ३३,२००रुपयांचा मुद्देमाल घेवुन पैसे थोड्यावेळाने आणुन देतो असे सांगुन पोबारा केला परंतु बराच वेळ होवुन सुध्दा सदर इसम परत न आल्याने आपण गंडविल्या गेलो याची उपरती कोल्हे तसेच किराणा व्यावसायिक व भांडे विक्रेता यांना झाल्यानंतर कोल्हे यांनी महागाव पोलीस स्टेशन गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगुन फिर्याद दाखल केली पोलिसांनी यावरून अनोळखी इसमा विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

####चौकट####

व्यापाऱ्यांचे फसवणूकीचे प्रकार दिवसागणित वाढत आहे येणाऱ्या काळात तहसीलदार ठाणेदार सीआयडी इन्कम टॅक्स अधिकारी म्हणून भामटे आपल्याकडे येतील त्यांच्यावर विश्वास न ठेवता न घाबरता त्यांचे आधार कार्ड व शासनाने दिलेला आयडी कार्ड मागण्याची हिंमत आपण करावी. महागाव तालुका व्यापार लाईन संघटनेचे अध्यक्ष जगदीश नरवाडे मो. 9881818149 वर संपर्क करावा

 
 
 

Recent Posts

See All

Comments


bottom of page