महागांव/पोलीस स्टेशन हददीत चारचाकी वाहनांतून गोवंश मासची वाहतुक करणा-या इसमांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई आज दिनांक 14/10/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा कडील पथक महागांव पोलीस स्टेशन हददीत पेट्रोली
- CT India News
- Oct 14
- 1 min read
महागांव/पोलीस स्टेशन हददीत चारचाकी वाहनांतून गोवंश मासची वाहतुक करणा-या इसमांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
आज दिनांक 14/10/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा कडील पथक महागांव पोलीस स्टेशन हददीत पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त माहिती मिळाली कि, मौजे पेढी येथील इसम नामे शेख अकील शेख मिरांजी हा त्याचे चारचाकी वाहनांतून गौवंश मांसची वाहतुक करीत असल्याबाबत गुप्त माहीती मिळाल्याने नमूद पथकांने पेढी-पोखरी रोड परिसरात सापळा रचून सदरचे वाहन क्रमांक एम एच 05 ऐजे 6521 थांबवून चेक केले असता त्यामध्ये 110 किलो गोवंश मांस प्रतिकिलो 240 प्रमाणे असा एकूण 26,400/- व सदर वाहन किंमत एक लाख रु असा एकूण मुद्देमाल एक लाख सव्वीस हजार रु चा मुददेमाल ताब्यात घेतला व पशू वैदयकिय अधिकारी यांना अभिप्राय घेवून त्याप्रमाणे पंचनामा करुन इसम नामे शेख अकील शेख मिरांजी वय 43 वर्ष, रा. पेढी ता. महागांव जि. यवतमाळ यांच्या विरुध्द पोलीस स्टेशन महागांव येथे गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता साहेब अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. पियुष जगताप. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. हनुमंत गायकवाड, पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात. धिरज बांडे, शरद लोहकरे, संतोष भोरगे, मुन्ना आडे, तेजाब रणखांब, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, रमेश राठोड, सुनिल पंडागळे,रविंद्र श्रीरामे, राजेश जाधव सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ च्या एल सि बि पतकांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
एस के शब्बीर जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ









Comments