*. रस्त्यावर बसणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करा.* शिवगर्जना युवा प्रतिष्ठान मनसर यांची निवेदन देऊन मागणी रस्त्यावर बसणाऱ्या जनावरांमुळे दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत असून होणारे अपघात थांबविण्यासाठी
- CT India News
- Aug 28, 2024
- 1 min read
*. रस्त्यावर बसणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करा.*
शिवगर्जना युवा प्रतिष्ठान मनसर यांची निवेदन देऊन मागणी
रस्त्यावर बसणाऱ्या जनावरांमुळे दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत असून होणारे अपघात थांबविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावी व बेजबाबदार पशुपालकांकडून दंड आकारावा असे निवेदन शिवगर्जना युवा प्रतिष्ठान,मनसर तर्फे प्रशासनाला देण्यात आले आहे.
दोन दिवसाअगोदर मनसर-रामटेक मार्गावर वाहिटोला येथे भरदाव ट्रकच्या धडकेत एकूण १२ निष्पाप वासरांचा जीव गेला होता.यात ट्रकचालकासहित पशुपालकाचीही निष्काळजीपणा असावी असं म्हणता येईल. याच परिसरात नव्हे तर नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील पवनी देवलापार चोरबाहुली कांद्री वस्ती कांद्री माईन मनसर,शितलवाडी,रामटेक अशा मुख्य मार्गावर देखील जनावरे उभे अथवा बसून असल्याचे चित्र दिसून येतात.
अशातच रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो तो वेगळा भाग.मात्र या जनावरांमुळे अनेक गंभीर स्वरूपाचे अपघात देखील झाल्याचे लक्षात येते.यात जनावरांच्या आणि सामान्य माणसांच्या देखील जीवाला धोका निर्माण होतो.अशा वेळी या जनावरांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे.
रस्त्यावर बसणाऱ्या जनावरांची सोय करावी व खाजगी मालकीचे जनावरे असल्यास मालकावर दंडात्मक कार्यवाही करावी अशी मागणी शिवगर्जना युवा प्रतिष्ठान मनसर यांच्यातर्फे उपविभागीय अधिकारी उपविभाग रामटेक ,तहसीलदार रामटेक उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक व पोलीस निरीक्षक रामटेक यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे..
सिटी इंडिया न्युज करीता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम









Comments