*शिरपूर ब्राह्मण समाजातर्फे तहसीलदारांना देण्यात आले निवेदन: आंदोलनास पाठिंबा*
- CT India News
- Aug 16, 2024
- 1 min read
*शिरपूर ब्राह्मण समाजातर्फे तहसीलदारांना देण्यात आले निवेदन: आंदोलनास पाठिंबा*
*धुळे जिल्हा प्रतिनिधि मयुर वैद्य*
दि. १५- भगवान परशुराम
आर्थिक विकास महामंडळाच्या स्थापनेसह ब्राह्मण समाजाच्या इतर मागण्यांसाठी दि. १५ ऑगस्ट पासून दीपक रणनवरे हे जालन्यात आंदोलन करीत आहेत. त्यांच्या आंदोलनाला शहरातील ब्राह्मण समाजाने पाठींबा दिला आहे. या संदर्भात काल तहसील कार्यालयात मागण्यांबाबतचे निवेदन देण्यात आले. निवेदन देण्यासाठी ब्राम्हण संघर्ष
समितीचे मुख्य समन्वयक केतन पंडित यांचा सोबत शिरपुर आद्य गौड़ ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष राजेंद्र पंडित, उपाध्यक्ष प्रशांत शर्मा, धुळे जिल्हाअध्यक्ष वारकरी साहित्य परिषद अॅड. प्रमोदजी महाराज, पीयूष शर्मा, जगदीश शर्मा, गोपाल पंडित, प्रवीण शर्मा, बबलू पंडित, मनोज पंडित, राहुल पंडित, अमित शर्मा, मनीष शर्मा, आशुतोष फणसे, हेमंत पाठक, वरद पाठक, नंदकिशोर जैन, बाळासाहेब पाटिल, रोहित सालुंखे व सोबत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.









Comments