शिरोली पोलिसांची गुटखा,बेकायदा देशी -विदेशी दारू विक्री व जुगार अशा अवैद्य प्रकरणी मोठी कारवाई : सपोनि सुनिल गायकवाड शिरोली पुलाची : सांगली फाटा येथील रिक्षा स्टॉपच्या आडोशाला गर्दीचा फायदा घेऊन ये
- CT India News
- Oct 27, 2024
- 2 min read
शिरोली पोलिसांची गुटखा,बेकायदा देशी -विदेशी दारू विक्री व जुगार अशा अवैद्य प्रकरणी मोठी कारवाई : सपोनि सुनिल गायकवाड
शिरोली पुलाची : सांगली फाटा येथील रिक्षा स्टॉपच्या आडोशाला गर्दीचा फायदा घेऊन येथील बसस्टॉपवर तीन पानावर पैसे लावून जुगार खेळ खेळणाऱ्या व प्रवाशांना लुटणाऱ्या दिनेश रामकृष्ण मळगावकर वय ४९, प्लॉट नं.११, खोली नं.६६० लोटस कॉलनी,गोवंडी मुंबई ४३ व प्रशांत दत्तात्रय दबडे वय २९ सिद्धार्थनगर, पेठवडगाव, ता.हातकणंगले अशा दोन सराईतांना शिरोली पोलिसांनी अटक केली.
शिरोली सांगली फाटा येथे नेहमी अशा प्रकारचा जुगार चालु असतो यामध्ये खेळणारे त्यांचेच असतात व त्यांना जुगार बसतो, त्यामुळे पाहणारे वाटसरू यांना त्याचा मोह आवरत नाही व ते त्यामध्ये न कळत ओढले जातात व कंगाल होतात. त्यामुळे अशा अवैद्य व बेकायदेशीर जुगार अड्डयावर सपोनि सुनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण, महादेव बिरांजे, गोपनीय चे निलेश कांबळे व नजीर शेख यांनी केली. सदरची कारवाई झाली त्यामुळे सांगली फाटा येथे नागरिकांच्यात समाधान व्यक्त होत आहे. यामध्ये सराईत आरोपीं कडून ३३९० रु. व मुद्देमाल जप्त केला आहे.
दुसऱ्या कारवाईत मावा तयार करण्यासाठी लागणारी तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक करताना जावेद जहाँगीर मिरजकर वय ३९ एकता कॉलनी शिरोली पुलाची यास अटक करून ५ हजार रुपयांची तंबाखूजन्य पत्ती व ७० हजार रुपये किंमतीची इलेक्ट्रिक बाइक असा सुमारे ७५ हजार रु. माल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत शिरोली पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मिरजकर हा शिरोली एमआयडीसी मध्ये जाफरानी वजन काट्याजवळ माव्यासाठी लागणारे तंबाखूजन्य पदार्थ सिमेंटच्या पोत्यातून वाहतूक करीत होता. अचानक पोलिसांनी त्याची गाडी आडवून तपासणी केली असता त्याच्याकडे असणाऱ्या सिमेंट पोत्यामध्ये बेकायदा तंबाखूजन्य पदार्थ आढळले.
सदर घटने बाबतची फिर्याद पोलिस कर्मचारी सुनील आनंदा गोरे यांनी दिली आहे. वरील सर्व कारवाया शिरोली पोलिस ठाणेचे नुतन सपोनि सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या आहेत.
तिसऱ्या कारवाईत मध्ये शिरोली पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, संभापूर - तासगाव रोडवरील भोसले गल्लीमध्ये अवैध देशी-विदेशी दारू व बिअर विक्री केली जात असल्याचे समजले त्यामुळे महिला पोलिस घेवून पो.कॉ.विद्या परीट यांनी भोसले यांच्या घरी छापा टाकला. यामध्ये ९२ हजार ५०० रुपये किंमतीची देशी विदेशी बनावटीची दारू व बिअरचे बॉक्सच्या -बॉक्स सापडले.
विक्री करणाऱ्या जयश्री भोसले यांच्यावर शिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सदरची कारवाई नुकताच कार्यभार स्वीकारणारे सपोनि सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.









Comments