श्री देवेन्द्र फडवणीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मार्फत :- जिल्हाधिकारी साहेब छ.संभाजीनगर विषय :-मराठा समाजाला 10% स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे तथा सरसकट ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करूं
- CT India News
- Sep 12
- 1 min read
प्रती
श्री देवेन्द्र फडवणीस साहेब
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
मार्फत :- जिल्हाधिकारी साहेब छ.संभाजीनगर
विषय :-मराठा समाजाला 10% स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे तथा सरसकट ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करूं नये याबाबत
महोदय
मराठा समाजाचे आदरणीय जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जे आंदोलन केले त्याची दखल मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घेऊन मा.मंत्री महोदय विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वात मराठा नेते जरांगे पाटील यांना हैद्राबाद गैझेट नुसार मराठा कुणबी जात प्रमाणपत्र देऊन ओबीसीचे आरक्षणात समाविष्ट करण्याचा GR काढण्याचे आदेश देण्यात आले.तो GR महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या मुलाबाळांच्या भविष्याचा तथा ओबीसी समाजातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय इच्छाशक्ती असणाऱ्यांसाठी आत्मघातकी असल्यांसारखा आहे.सात ते आठ कोटी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात समाविष्ट केले तर 27% ओबीसी आरक्षण ते आताच्या परिस्थितीत ओबीसी समाजाला फक्त 17% मिळते त्यातही सरसकट मराठ्यांना कुणबी समाजाचे दाखले देऊन ओबीसीचे आरक्षण नगण्य होऊन जाईल.ज्यामुळे ओबीसी प्रवर्गाची आर्थिक सामाजिक शैक्षणिक विकास मंदावेल.मराठा समाजातील काही समाज ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे.कारण आधुनिक काळात मराठ्यांच्या शेती,उद्योग व्यवसाय हे औद्योगिकरणामुळे डबघाईस आले आहेत.काही मराठ्यांमध्ये मोजकेच धनदांडगे आहे.त्यामुळे मराठ्यांचे आर्थिक मुल्यांकन होऊन ज्यांची आर्थिक परिस्थिती योग्य नाही त्यांना कायद्यामध्ये सुधारणा करून स्वतंत्र 10% आरक्षण द्यावे जेणेकरून ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता त्यांना आरक्षण मिळावे.जर बिना आंदोलन करता सवर्ण समाजाला आरक्षण केंद्रशासन देऊ शकते तर मराठ्यांना का बरं नाही.या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून शासनाने मराठा समाजाला कायद्यामध्ये सुधारणा करून 10% स्वतंत्र आरक्षण द्यावे.जेणैकरून ओबीसी प्रवर्गाचे नुकसान होणार नाही.ओबीसी समाजाला न्याय मिळेल.अशी मागणी श्री संताजी अखिल तेली समाज संघटन छ.संभाजीनगर जिल्हा चे वतीने जिल्हाध्यक्ष श्री.संतोष भानुदास गायकवाड पालखेडकर महासचिव डॉ.बाबासाहेब क्षीरसागर कार्याध्यक्ष श्री.संतोष सुरुळे यांचे वतीने करीत आहोत.सरकारने निवेदनाला सकारात्मक घेऊन योग्य तो मार्ग काढुन न्याय द्यावा.निवेदन पुढील कार्यवाईस पाठवितो असे आश्वासन मा.जिल्हाधिकारी साहेब यांनी संघटनेला दिले.









Comments