top of page

*श्री.सदानंदजी निमकर साहेब यांचा राजकारणी जीवन परिचय*.... सध्या नागपुर जिल्ह्याचा राजकारणामध्ये सुसंस्कृत व संवेदनशील व्यक्तिमत्त्व असलेले जे काही मोजके नेते आहेत त्यामध्ये सन्माननीय श्री.सदानंदजी नि

  • Writer: CT India News
    CT India News
  • Aug 17, 2024
  • 2 min read

*श्री.सदानंदजी निमकर साहेब यांचा राजकारणी जीवन परिचय*....


सध्या नागपुर जिल्ह्याचा राजकारणामध्ये सुसंस्कृत व संवेदनशील व्यक्तिमत्त्व असलेले जे काही मोजके नेते आहेत त्यामध्ये सन्माननीय श्री.सदानंदजी निमकर अरोलीची सुपुत्र यांचे नाव आदराने घेतले जाते. सन १९७७ पासून जिल्ह्याचा राजकारणात सक्रियपणे कार्यरत असलेले सदानंदजी निमकर यांच्याकडे राज्यातील राजकारना मधील एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून आदराणे पाहिले जाते.राजकारणा पलीकडे सर्वच पक्षांमध्ये तसेच मित्रपरिवार असणाऱ्या मोजक्या नेत्यांमध्ये सुद्धा सदानंदजी निमकर यांचाकडे आदराने पहिल्या जाते.

जिल्ह्याचा राजकारणामध्ये सदानंदजी निमकर नावाची चर्चा गेली काही वर्षांपासून सातत्याने कायम आहे. आगामी काळात हे वलय आणखी विस्तारित जाणार यात काहीच शंका नाही.विकासाचे जाण असलेले कार्यक्षम नेतृत्व नागपुर जिल्ह्यात मौदा तालुक्याला लाभले आहे.सदानंदजी निमकर साहेबाबरोबर चर्चा म्हणजे नवीन माहितीची सकारात्मक ऊर्जेची पहलच असते.गेली ४७ वर्षातील राजकारणाची परिपूर्ण माहिती असणारे सदानंदजी निमकर म्हणजे राजकीय विद्यापीठ आहे.यांच्याकडे राजकारणा बरोबर विकास क्षेत्रातील माहितीच्या प्रचंड खजिना असल्याचा प्रत्यय येतो.अभ्यासाच्या प्रचंड व्यासंग हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.अनेक विषयांचे अभ्यासू माहिती त्यांच्याकडे असल्याने नवीन विचारांची देवान घेवान करणारे व्यासपीठ म्हणजे सदानंदजी निमकर होय.

अरोली चे सुपुत्र नागपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष,नागपूर जिल्ह्यातील लोकप्रिय भाजप नेते श्री.सदानंद चंद्रभानजी निमकर यांचा जन्म १७ ऑगस्ट १९५० साली अरोली येथे झाला.

शालांत परीक्षेनंतर आपल्या मोहता विज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेऊन १९७७ मधे बी.एस्सी.ची परीक्षा उत्तीर्ण केली. शिक्षणानंतर त्यांनी नोकरीचा विचार बाजुला ठेवून पारंपारिक शेतीचा व्यवसाय निवडला व आपले गावच आपले कार्यक्षेत्र केले.आपल्या मनमोकळ्या व प्रेमळ स्वभावामुळे आणि सर्वांना सहकार्य करण्याच्या वृत्तीमुळे त्यांना जनमानसात स्थान निर्माण झाले व त्यांनी १९७७ मधे सक्रिय राजकारणात भाग घेण्यासाठी भाजप मधे प्रवेश केला.सुरवातीला ते माजी आमदार स्व.पांडुरंग हजारे यांचे कार्यकर्ते होते.१९८८ ते १९८४ या काळात ग्रामपंचायत सदस्य व सरपंच होते.१९८२ मधे त्यांनी माजी मंत्री स्व.मधुकरराव किंमतकर यांचे आग्रहाखातर काँग्रेसमधे प्रवेश केला.१९७८ ते १९९२ या १४वर्षांत अरोली गावचे सरपंच म्हणून अनेक लोकोपयोगी कामे केलीत व आपल्या कामाचा ठसा परिसरात उमटवला.१९८६ ते १९९२ याकाळात ते रामटेकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती होते.

१९९२ ते १९९७ अशी पाच वर्षे ते नागपूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती देखील होते.या दरम्यान आठ महिन्यांसाठी नागपूर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

त्यानंतर १९९९ मे सदानंद यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधे प्रवेश केला. २००४ ते २०१२ या कालावधीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले.

२०१५ मधे मात्र केंद्रीय मंत्री ना.नितीनजी गडकरी यांच्या विकास कार्यावर विश्वास ठेवून माजी मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या उपस्थितीत ते स्वगृही म्हणजे भाजप मधे परत आले. जवळपास ४२-४३ वर्षांपासून त्यांचा सक्रिय राजकारणात सहभाग असून त्यांना परिसरातील समस्यांची पुरती जाण आहे. ते मा.ना.नितीनजी गडकरी यांचे जवळचे व विश्वासू मानले जातात.

श्री.सदानंद निमकर यांना मोठा अनुप व लहान सौरभ ही दोन मुले असून सौ.रिमा ही मुलगी तर लेफ्टनंट कर्नल प्रवीण हे जावई आहेत.

आजच्या या दिना निमित्त इंडियन पब्लिक स्कूल तर्फे शूभेच्छा देण्यात आले...


तालुका प्रतिनिधी राहुल पानतावणे

 
 
 

Recent Posts

See All

Comments


bottom of page