*स्वतंत्रता दिनानिमित्त शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांची तिरंगा मोटार सायकल रॅली*
- CT India News
- Aug 13, 2024
- 1 min read
*स्वतंत्रता दिनानिमित्त शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांची तिरंगा मोटार सायकल रॅली*
*धुळे जिल्हा प्रतिनिधि मयुर वैद्य*
स्वतंत्रता दिनानिमित्त दि.१३/०८/२०२४ रोजी मा. प्रधान मंत्री यांच्या हर घर तिरंगा या संकल्पनेला प्रसार व प्रचार हेतू शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांची तिरंगा मोटार सायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे.
दि.१५ ऑगस्ट २०२४ रोजी भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा होणार असल्याने त्यानिमित्ताने हर घर तिरंगा या संकल्पनेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी दि.१३/०८/२०२४ रोजी सकाळी ०८.३० वाजता तहसिल कार्यालय, शिरपूर जि. धुळे येथे मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलेली आहे. त्यामध्ये शासकीय अधिकारी/ कर्मचारी तहसिल कार्यालय, शिरपूर, शिरपूर-वरवाडे नगर परिषद तसेच पोलीस प्रशासन विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत.
सदर तिरंगा मोटार सायकल रॅली तहसिल कार्यालय येथुन निघुन नगर परिषद, कुंभारटेक, पाच कंदिल, गुजराथी कॉम्प्लेक्स मांडळ रोड, करवंद नाका, पित्रेश्वर स्टॉप व तेथुन नगर परिषद येथे समारोप करण्यात येणार आहे.
शिरपूर शहरातील सर्व नागरीकांना शिरपूर शहर पो. स्टे चें पोलिस निरीक्षक श्री के के पाटील साहेबांनी जाहिर आवाहन केले असून भारताचे नागरीक या नात्याने मोठ्या संख्येने मोटार सायकल सह सहभागी होण्यास सांगितले आहे. आपण मोटार सायकल रॅलीत आपल्या मोटार सायकलवर तिरंगा ध्वज लावून दि.१३/०८/२०२४ रोजी सकाळी ०८.३० वाजता तहसिल कार्यालय, शिरपूर जि. धुळे येथे उपस्थित राहुन सहभागी होण्यास आव्हान केले आहे.









Comments