स्वातंत्र्योत्तर काळात शाळांची भूमिका अत्यंत महत्त्वाची - डॉ. वसंत भोसले कौतुक विद्यालय शिरोली येथे साजरा करण्यात आलेल्या 77 व्या भारतीय स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे ध्वजारोहण दैनिक लोकमतचे संपादक मा. ड
- CT India News
- Aug 15, 2024
- 1 min read
स्वातंत्र्योत्तर काळात शाळांची भूमिका अत्यंत महत्त्वाची - डॉ. वसंत भोसले
कौतुक विद्यालय शिरोली येथे साजरा करण्यात आलेल्या 77 व्या भारतीय स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे ध्वजारोहण दैनिक लोकमतचे संपादक मा. डॉ. श्री वसंत भोसले यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी बोलताना त्यांनी 15 ऑगस्ट व 26 जानेवारी या राष्ट्रीय सणांचे विशेष महत्त्व स्पष्ट केले. आपला देश विविधपूर्ण असूनही एकसंघ आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही भारतामध्ये आहे देशाला सशक्त बनविण्यासाठी आपण एकजुटीने काम केले पाहिजे. स्वातंत्र्य लढाई इतकीच लोकशाही दृढ करण्यासाठी आणि विकसित भारत बनविण्यासाठी शाळांनी अधिक सजग राहून सुरजनशील नागरिक बनविण्याची भूमिका समर्थपणे पार पाडली पाहिजे असे सांगितले. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली.
डॉक्टर वसंत भोसले यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष बीएच पाटील यांच्या हस्ते झाला . यावेळी एसएससी मार्च 2024 परीक्षेमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विविध शाळांच्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी शिरोलीतील प्रतिष्ठित नागरिक विविध संस्थांचे पदाधिकारी पालक माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापिका योगिता लंबे - वाणी यांनी, आभार बी. बी. मुल्ला तर सूत्रसंचालन तेजस्विनी खाडे यांनी केले .
अतुल सुतार, कोल्हापूर प्रतिनिधी









Comments