महागाव येथे महिला दिनानिमित्त शिलाई मशीन व ब्युटी पार्लर किट वाटपाचा भव्य कार्यक्रम उत्साहात साजरा …
यवतमाळ (प्रतिनिधी) एस के शब्बीर
महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी जनसेवा फाउंडेशन आणि सक्षम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून शिलाई मशीन व ब्युटी पार्लर किट वाटपाचा भव्य कार्यक्रम फार मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
हा कार्यक्रम महागाव शहरातील सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय येथे मोठ्या जल्लोषात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महागाव नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्ष सौ. सुनंदा दिलीपराव कोपरकर या होत्या , तर उद्घाटन म्हणुन महागाव तहसील कार्यालयाचे तहसीलदार अभय मस्के यांच्या हस्ते करण्यात आले .
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष रंजना दीपक आडे , महागाव शहरातील ज्येष्ठ नेते तथा महागाव तालुका जिनिंग प्रेसिंग चे अध्यक्ष संभाजीराव नरवाडे , उपाध्यक्ष प्रमोद भरवाडे , उमरखेड येथील समाजसेविका सरोज देशमुख , सविता चंद्रे , केवटे , नगरसेविका जयश्री संजय नरवाडे , महागाव नगरपंचायतचे नगरसेवक तथा काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शैलेश कोपरकर , माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल नरवाडे , महागाव नगरपंचायत च्या माजी नगरसेविका आशाताई सुनील भरवाडे , समाजसेविका शीलाताई सुरेश भरवाडे , महागाव तालुका खरेदी-विक्री संघाच्या संचालिका सीमाताई नितीन नरवाडे , महागाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश भोयर , महागाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय कोपरकर , सुभाषराव शिंदे , यांच्या ज्येष्ठ पत्रकार गजानन वाघमारे तसेच संजय भगत , नगरसेविका सुरेखा विनोद कोपरकर , नगरसेविका करूना शिरबिरे, जान्हवी सुरोशे , यांची विशेष उपस्थिती होती .
कार्यक्रमात संजय भगत यांनी आपल्या मनोगतातून महिला सक्षमीकरणाचे महत्त्व अधोरेखित करत अल्प शब्दांत प्रभावी विचार मांडले. महिलांनी स्वावलंबी होण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनार्दन सुरोशे यांनी केले. त्यांनी या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट करत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अशा योजनांचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल पाटील सोनटक्के यांनी प्रभावीपणे केले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन महागाव शहरातील अक्षदा ब्युटी पार्लरच्या संचालिका पूनम विजय भरवाडे यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
या कार्यक्रमासाठी महागाव शहरातील शेकडो महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. शिलाई मशीन व ब्युटी पार्लर किटचे वाटप करून महिलांना स्वावलंबनाचा नवा मार्ग उपलब्ध करून देण्यात आला.
एकूणच, महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम महागाव शहरात महिला सक्षमीकरणाचा प्रेरणादायी संदेश देणारा ठरला असून भविष्यातही अशा उपक्रमांची अपेक्षा व्यक्त होत आहे. या उपक्रमा अंतर्गत शहरातील बारा महिलांना शिलाई मशिन चे वाटप करण्यात आल्या आहेत त्यामध्ये प्रिती नरवाडे , ज्योशना नेवरे , शितल नरवाडे , शिल्पा कावळे , कीर्ती पाटे , आरती नेवारे , वैशाली गावंडे , दुर्गा कुसंगवर , अश्विनी नरवाडे , ऋतुजा पवार , प्राजक्ता नरवाडे , यांचा समावेश होता तसेच ब्युटीपार्लर किट करिता प्रियंका लोंढे , रिंकू बहादूरे , सुषमा चावतमळ, रुपाली कदम , वर्षा राठोड , वैष्णवी जाधव , नंदिनी कदम , कल्याणी कदम , यांची निवड करण्यात आली होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न म्हणून महागाव शहरातील बाबाराव ठाकरे , अशोकराव कदम , नंदाताई रमेश कदम , सुजाता कोपरकर , मेघा नरवाडे , वैष्णवी कदम , संगीता कदम , संगीता भरवडे , विजय भरवाडे , प्रविण चिलकर यांच्यासह अनेकांनी अथक परिश्रम घेतले .
