गोंदिया शहर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी…

गोंदिया शहर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी…

एकूण 4,33,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त..

गोंदिया:- दिनांक 2 मे 2026 रोजी माननीय पोलीस निरीक्षक साहेब यांचे आदेशान्वये पोलीस पथकासह अवैध धंद्यावर कारवाई करण्याकरिता पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली असता इसम नामे असलान उर्फ बाबू इकबाल खान, राहणार शास्त्री वार्ड संजय नगर गोविंदपुर गोंदिया हा त्याचे राहते घरी एम.डी. पावडर हे अमली पदार्थ बाळगून विक्री करीत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने माननीय वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक साहेब ,पोलीस स्टॉप, दोन शासकीय पंच, फोटोग्राफर, वजन काटा मापारी व रेड करिता लागणारे साहित्य सोबत घेऊन शासकीय वाहन व खाजगी वाहनाने शास्त्री वार्ड, संजय नगर गोविंदपुर गोंदिया येथे पोहोचून नामे असलान उर्फ बाबू इकबाल खान, वय 21 वर्षे, राहणार शास्त्री वार्ड, संजय नगर, गोविंदपुर गोंदिया असे सांगितले, त्याचे हजेरीत त्याच्या घराची झेडपी घेतली असता घरझडतीत बेडरूम मध्ये दक्षिण पश्चिम कोपऱ्यात असलेल्या एका लोखंडी पेटीमध्ये एका कापडी गुलाबी रंगाच्या पिशवीत एका लहान स्टीलच्या डब्यात एका पारदर्शक प्लास्टिक पॉलिथिन मध्ये मळकट रंगाचा पावडर दिसून आला. आम्ही सदर विश्वाच्या घर झळतीत मिळून आलेल्या पावडरबाबत पंचा समक्ष विचारणा केली असता त्याने सदरच्या पावडर हा मेथाडॉन एम.डी. क्रिस्टल पावडर असल्याचे सांगितले. मिळून आलेल्या अमली पदार्थ मेथॉडान (एम.डी.) क्रिस्टल पावडर चे वजन केले असता त्याचे वजन 19.7 ग्रॅम असून 22000/- प्रति.ग्राम प्रमाणे 4,33,400/-रुपये व विवो कंपनीचा मोबाईल किंमत 10,000/-रुपये असा ऐकून 4,43,400/-रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी असलान उर्फ बाबू इकबाल खान, राहणार शास्त्री वार्ड, संजय नगर गोविंद गोंदिया यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन गोंदिया शहर अप.क्र.360/2026 कलम 8 (क),22(ब), एन डी पी एस; ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले असून सदर गुन्ह्याच्या तपास पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव गेडाम हे करीत आहेत.

ही कामगिरी श्री. गोरख भामरे पोलीस अधीक्षक गोंदिया, श्री अभय डोंगरे अप्पर पोलीस अधीक्षक गोंदिया, श्री साहिल झरकर उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोंदिया शहर चे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव गेडाम, डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अनिल डोंगरवार, सहाय्यक फौजदार कवलपालसिंग भाटिया, पोलीस हवालदार सुदेश टेंभरे, दीपक रहांगडाले, निशिकांत लोंदासे, सतीश शेंडे, प्रमोद चव्हाण, पोलीस शिपाई दिनेश बीसेन, सुभाष सोनवाणे, अशोक रहांगडाले, कुणाल बारेवार, मुकेश रावते, प्रमोद शेंडे, सोनू नागपुरे, राकेश बंजारे, अजय बोपचे, विजय बीसेन, यांनी केली आहे.

गोंदिया जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *