बदली होतात बाजीराव सिंघम मैदानात महागावात दारू अवैध हातभट्टी वर ए.पी.आय अंबोरे यांचे बुलडोझर 

बदली होतात बाजीराव सिंघम मैदानात महागावात दारू अवैध हातभट्टी वर ए.पी.आय अंबोरे यांचे बुलडोझर

 

 

 

एस के शब्बीर जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ

 

 

महागाव तालुक्यात मागील दोन वर्षांपासून खुलेआम सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारूच्या व्यवसायावर अखेर पोलिस वर्दीचा बुलडोझर

अवैध देशी दारू अड्ड्यांवर धाडी टाकण्यात येत असून, या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध धंद्यांचे जाळे उघडकीस झाले आहे.

मागील काळात तत्कालीन ठाणेदार धनराज निळे यांच्या कार्यकाळात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाल्याची चर्चा परिसरात होती. त्यांच्या बदलीनंतर त्यांना वाजतगाजत निरोप देण्यात आला असला, तरी अवैध व्यवसायांवर प्रभावी अंकुश लावण्यात पोलिसांना यश आले नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात होता.

दरम्यान, प्रभारी ठाणेदार म्हणून पदभार स्वीकारताच ए.पी.आय आंबोरे यांनी अवैध धंद्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत महागावसह परिसरातील मोहाच्या दारूचे अड्डे व इतर बेकायदेशीर व्यवसायांवर धाडी टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे मागील काळात अवैध धंदे किती मोठ्या प्रमाणावर सुरू होते, याबाबत पुन्हा चर्चा रंगू लागली आहे.

करंजखेड, पिंपरी आणि आमणी या गावांतील महिलांनी अवैध दारू व्यवसाय बंद करण्यासाठी महागाव पोलीस ठाण्यासमोर आंदोलनही छेडले होते. मात्र त्यानंतरही अवैध धंदे आणि चोरीच्या घटनांमध्ये अपेक्षित घट झालेली नव्हती, अशी नागरिकांची भावना आहे.

सध्या सुरू असलेल्या धडक कारवाईमुळे अवैध हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, तालुक्यातील इतर गावांमध्येही अशाच प्रकारच्या मोहिमा राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी ठाणेदार ए.पीआय

पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

खरा वर्दीतला वाघआता बाजीराव सिंघम. मैदानात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *