अपघातग्रस्त कुटुंबासाठी, देवदूतसारखे पोलीस व समाजसेवक धावले;
जिल्हा प्रतिनिधी एस के शब्बीर महागाव
महागाव : अक्कलकोट येथे दर्शन घेऊन आपल्या मूळ गावी परतत असताना गोहणे कुटुंबीयांच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातात दोन लहान मुलांसह एका महिलेस दुखापत झाली. मात्र, महागाव पोलिसांनी व समाजसेवकांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे संकटग्रस्त कुटुंबाला तातडीची मदत मिळाली आणि मानवतेचे प्रेरणादायी दर्शन घडले.
घटनेचा तपशील
गोहणे व पावडे कुटुंबीय हे दोन्ही कुटुंब एम एच-३८ सी एमआर-७९९० क्रमांकाच्या कारने अक्कलकोट येथून दर्शन घेऊन परतत होते.
रविवारी मध्यरात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास मुडांना हायवे परिसरात त्यांच्या वाहनाचा अपघात झाला.
अपघातात कारचे मोठे नुकसान झाले.
वाहनातील दोन बालकांना व एका महिलेला गंभीर दुखापत झाली, तर पाच वर्षीय मुलालाही मार लागला.
पोलिसांची तातडीची मदत
घटनेची माहिती मिळताच महागाव पोलीस ठाण्याचे (डॅशिंग प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील अंबुरे )पोलीस कर्मचारी संतोष पडळकर व श्रीधर भवनकर घटनास्थळी दाखल झाले.
जखमींची गंभीर अवस्था लक्षात घेऊन कोणताही विलंब न करता सर्वांना स्वतःच्या वाहनातून तातडीने पुसद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ए.पि.आय सुनिल अंबुरे देवरुपी सारखे यांच्या तत्परतेमुळे जखमींना वेळेत वैद्यकीय उपचार मिळू शकले.
समाजसेवकांचा मोलाचा सहभाग
पुसद येथे पोहोचल्यानंतर उटी गावचे समाजसेवक प्रशांत गावंडे यांनी रुग्णालयात उपस्थित राहून जखमी कुटुंबीयांना आवश्यक ती मदत व मानसिक आधार दिला.
रात्रीच्या वेळी संकटात सापडलेल्या कुटुंबासाठी ए.पी.आय.सुनिल अंबुरे व समाजसेवकांनी केलेल्या सहकार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मानवतेचा संदेश
संकटाच्या क्षणी धावून जाऊन जीव वाचविण्यासाठी केलेले हे कार्य खऱ्या अर्थाने मानवतेचे उदाहरण ठरले आहे. महागाव पोलिसांची सामाजिक बांधिलकी, संवेदनशीलता आणि कर्तव्यदक्षता यामुळे या घटनेत मदतीचा हात मिळाल्याने जखमी कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला.
