गुणवत्तेची कास धरल्यास शाळेच्या भौतिक सुविधा करणे सहज शक्य*.

*गुणवत्तेची कास धरल्यास शाळेच्या भौतिक सुविधा करणे सहज शक्य*.

……प्राचार्य अनिल साकोरे

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संस्थेच्या पुणे विभागातील सर्व मुख्याध्यापक व लेखनिक कार्यशाळा श्री छत्रपती संभाजी हायस्कूल व जुनीयर कॉलेज कोरेगाव भिमा येथे संपन्न झाली त्यामधे प्राचार्य श्री अनिल साकोरे बोलत होते.

दिवसभर घेतलेल्या सहविचार सभेत शालेय गुणवत्ता, शाळेच्या भौतिक सुविधा, विद्यार्थी प्रवेशवाढ , संचमान्यता याबाबत सखोल मार्गदर्शन संस्थेचे सहसचिव प्राचार्य गवळी व प्राचार्य मदन दिवे यांनी केले सहविचार सभेसाठी संस्थेचे सहसचिव प्रशासन प्राचार्य एस. एम. गवळी ,पुणे विभाग विद्यासमिती अध्यक्ष प्राचार्य मदन दिवे,विद्यासमिती सचिव प्राचार्य इस्माईल सय्यद तसेच पुणे विभागातील सर्व शाखांचे मुख्याध्यापक व लेखनिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुष्पलता गिरी मॅडम यांनी केले तर आभार श्री इस्माईल सय्यद यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *