*बुटीबोरी मधिल भाविकांचा गाडीचा मोठा अपघात*
बुटीबोरी मधील भाविक दर्शनासाठी मध्यप्रदेश मधील कुबेश्वर धाम ला जात असताना मुलताई -बैतूल महामार्गावर कडेवर उभा असलेला ट्रकला भाविकांच्या गाडीने धडक दिली,मोठा अपघात झाला हा अपघात शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास झाला धडक इतकी भीषण होती की जागेवरच तीन भाविकांचा करुण अंत झाला, मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार वाहन चालक यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला धडक इतकी भीषण होती की आवाजामुळे परिसरातील नागरिकांनी व रोडवरील धाब्या वाल्यांनी अपघात गस्त यांना मदतीसाठी धाव घेतली स्थानिक पोलीस प्रशासन यांनी सुद्धा तात्काळ मदत केली मात्र दुर्दैवाने बुट्टी बोरी येथील दीपक राऊत त्यांची पत्नी छाया दीपक राऊत व
प्रभा कौरती सातगाव यांचा घटनास्थळीस मृत्यू झाला वरील बातमी बुटीबोरीला येतात सर्व परिसरात शोककळा पसरली
स्थानिक पोलिसांनी जखमींना तात्काळ रुग्णवाहिका बोलावून मुलताई येथे शासकीय रुग्णालय मध्ये दाखल करून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले मात्र सर्वांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना तात्काळ नागपूरला रेफर करण्यात आले
जखमींचा नागपूरच्या रुग्णालय मध्ये उपचार चालू आहे
प्रतिनिधी -शरद कबाडे बुटीबोरी
