करडी पोलिसांचा वाळू माफियांना दणका; धडाकेबाज कारवाईत ७ लाखांचा मुद्देमाल जप्त!

करडी पोलिसांचा वाळू माफियांना दणका; धडाकेबाज कारवाईत ७ लाखांचा मुद्देमाल जप्त!

 

भंडारा:

अवैध धंद्यांविरुद्ध ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबवत करडी पोलिसांनी वाळू तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अत्यंत सतर्कता आणि धाडसाचे प्रदर्शन करत पोलिसांनी ७ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

महसूल विभाग नुसते आपापले हात ओले करत असतात. पोलिसांनाच का म्हणून दिसतो अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर महसूल विभागातील मंडळ अधिकारी व तहसीलदार यांनाच का दिसत नाही, महसूल विभागाला होतो महिन्या काठी लक्ष्मीचा दर्शन, महसूल विभागाचे तितकेच कौतुक करावे!,

करडी चे सहायक पोलीस निरीक्षक यांनी रुजू झालेल्या दिनांक पासून अवैध रेती वाहतुकीवर अंदाजे किंमत 13 ते 14 करोड रुपयांच्या कारवाया करण्यात आलेले आहेत आणि असंख्य कारवाही भंडारा जिल्ह्यातील करडी पोलीस स्टेशन येथे प्रथमच दिसून येतो,

पोलिसांची तत्परता आणि ‘ऑन द स्पॉट’ कारवाई

मिळालेल्या गुप्त माहितीचा अचूक वापर करत, नरसिंहटोला ते मनोरा रोडवर पोलिसांनी सापळा रचला. स्वतःच्या कर्तव्याप्रती असलेल्या निष्ठेतून पोलिसांनी भरधाव ट्रॅक्टर अडवून त्याची कसून तपासणी केली. यावेळी निळ्या रंगाच्या ‘स्वराज ७३५ XM’ ट्रॅक्टरमध्ये विनापरवाना रेतीची चोरी होत असल्याचे निष्पन्न झाले.

स्वराज ट्रॅक्टर (MH36-1-0509): किंमत ६,००,०००/- रुपये.

विना क्रमांकाची ट्रॉली: किंमत १,००,०००/- रुपये.

अवैध रेती (१ ब्रास): किंमत ६,०००/- रुपये.

एकूण ७,०६,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

कायद्याचा बडगा

या प्रकरणी चालक नागेश्वर संपत मेश्राम (वय २५) आणि मालक विवेक कुथे (वय ३७) यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), ४९ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम आणि पर्यावरण संरक्षण अधिनियमान्वये कडक गुन्हा नोंदवण्यात आला.

 

कर्तव्यदक्ष टिमचे कौतुक

ही यशस्वी कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन सा. आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश मोरे सा. यांच्या मार्गदर्शनाखाली, सपोनि. नागलोत सा. व पो.हवा. मडावी यांनी अत्यंत चोखपणे पार पाडली. गुन्हेगारांमध्ये दहशत आणि सामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणाऱ्या या कामगिरीबद्दल करडी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

अशाच धाडसी कारवायांमुळे कायद्याचे राज्य अधिक मजबूत होत असून, करडी पोलीस खऱ्या अर्थाने जनतेचे रक्षक ठरत आहेत!

 

भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *