हार्बर रेल्वे मार्गावर आज पहाटेच्या सुमारास एक मोठा तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली. नेरूळ स्थानकाजवळ ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) म्हणजेच लोकल ट्रेनला वीज पुरवठा करणारी ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे हार्बर मार्गावरील लोकल सेवा काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती. या घटनेमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या अप मार्गावरील लोकल वाहतुकीला मोठा फटका बसला.
मध्य रेल्वेने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, नेरूळ स्थानकाजवळ आज पहाटे ४:५२ वाजण्याच्या सुमारास ओव्हरहेड वायर अचानक तुटली. मुख्य उपनगरीय मार्गावरील वाहतूक सुरू होण्याच्या वेळेतच हा बिघाड झाल्याने रेल्वे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे तांत्रिक पथक आणि अभियंते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आणि अवघ्या ५५ मिनिटांत, म्हणजेच पहाटे ५:४५ वाजता ही ओव्हरहेड वायर पूर्ववत करण्यात रेल्वे कर्मचाऱ्यांना यश आले.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी प्रोफाइलवर दिलेल्या लिंकवर क्लिक करा
