ॲड. मधुकर तिघरे यांचे निधन

ॲड. मधुकर तिघरे यांचे निधन

ॲड. मधुकर तिघरे यांचे निधन मौदा : मौदा शहरातील ज्येष्ठ काँग्रेस नेते, ज्येष्ठ विधिज्ञ, माजी सरपंच, माजी नगरसेवक तसेच शहरातील पहिले ॲडव्होकेट म्हणून परिचित असलेले ॲड. मधुकर तिघरे (७३) राहणार जस्तंभ चौक मौदा यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने मौदा शहरात शोककळा पसरली आहे. ॲड. तिघरे यांनी सामाजिक, राजकीय आणि सार्वजनिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी जनतेच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने काम केले. कायदेविषयक मार्गदर्शनासोबतच सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. त्यांच्या कार्यामुळे त्यांनी समाजात एक आदरणीय स्थान निर्माण केले होते. ते मौदा नगरपंचायतीचे नगरउपाध्यक्ष शुभम तिघरे यांचे आजोबा होत. त्यांच्या पत्नी मालती तिघरे या दोन वेळा जिल्हा परिषद सदस्या म्हणून कार्यरत होत्या आणि त्यांनीही सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रांतील मान्यवर, नागरिक आणि हितचिंतकांनी शोक व्यक्त केला. त्यांच्या पश्चात पत्नी मालती तिघरे, कुटुंबीय, नातेवाईक आणि मोठा मित्रपरिवार असा परिवार आहे. त्यांच्यावर उद्या दुपारी १ वाजता मौदा येथील स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने मौदा शहराने एक अनुभवी विधिज्ञ, ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

 

नागपुर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *