“युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय,भारत सरकार” व “मेरा युवा भारत,छत्रपती संभाजीनगर” यांच्या संयुक्त विद्यमाने व “सेवा संकल्प उन्नती प्रतिष्ठान” यांच्या सहकार्याने, “जिल्हा युवा अधिकारी सौ.मेघा सानवाल”
सोयगाव प्रतिनिधी संतोष गर्दे
यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सोयगाव तालुक्यात “युवा मंडळ विकास कार्यक्रम- २०२६-२७” राबविण्यात येत आहे.
या कार्यक्रमांतर्गत संपूर्ण सोयगाव तालुक्यातील युवकांना संघटित करून त्यांचे युथ क्लब(युवा मंडळ)स्थापन करण्यात येत आहे. तद्नंतर या मंडळांना जिल्हा युवा अधिकारी कार्यालय अर्थात सध्याचे मेरा युवा भारत कार्यालयाशी संलग्न केले जाते.
युवकांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांना वाव मिळावा,युवकांचा व्यक्तीमत्व विकास व नेतृत्व विकास व्हावा,विविध विषयांवर आयोजित चर्चासत्रे,अभ्यास सहली,चित्रकला,वकृत्व,सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सहभागी होता यावे व “आत्मनिर्भरत व विकसित भारत” व्हावा हा या कार्यक्रमामागचा उद्देश आहे.
त्याचप्रमाणे युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या नवीनचं https://mybharat.gov.in/ या संकेतस्थळावर देखील युवकांनी आपली नोंदणी करत.विविध स्पर्धा,परिक्षा,उपक्रम,कार्यक्रम,उभियानांमध्ये सहभागी होण्याची संधी देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या “युवा मंडळ विकास कार्यक्रम- २०२६-२७” चे मौजे-शिंदोळ ता-सोयगाव.येथे ०५ मंडळ स्थापन करत उद्घाटन करण्यात आले आहे.
यावेळी मंडळांना मेरा युवा भारत,छत्रपती संभाजीनगर तर्फे मौदानी क्रीडा साहित्य देखील वितरीत करण्यात आले.
“या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त तरूणांनी लाभ घ्यावा व आपले युवा मंडळ स्थापन करून विकसित भारत घडवण्यासाठी संघटीत प्रयत्न करावा” असे सेवा संकल्प उन्नती प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष तथा कार्यक्रम अधिकारी श्री.जगदिश ज्ञानेश्वर सोनवणे यांनी प्रतिपादन तथा आवाहन केले.
