नीट पेपरफूट पारशीवणी तहसील कार्यालयावर मोर्चा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून तरुणांना न्याय द्या

नीट पेपरफूट पारशीवणी तहसील कार्यालयावर मोर्चा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून तरुणांना न्याय द्या तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन

पारशिवनी

कथित नीट पेपरफुटी प्रकरणामुळे पारशिवनी परिसरातील नागरिक आणि पालकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आंदोलनानंतर राष्ट्रपतींच्या नावाने तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. याप्रकरणी तात्काळ कारवाई करून तरुणांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनापूर्वी, मोर्चेकऱ्यांनी दोन मिनिटांचे मौन पाळून नीट पेपरफुटी प्रकरणात मृत्युमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

निवेदनात म्हटले आहे की, नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटणे ही एक अत्यंत गंभीर बाब असून, त्याचा परिणाम देशभरातील हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर होत आहे. या घटनेमुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये तीव्र असंतोष आणि संताप निर्माण झाला आहे. परीक्षेतील हेराफेरीमुळे अनेक विद्यार्थी मानसिक तणाव आणि निराशेचा सामना करीत आहेत.

याप्रसंगी, नीट किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेतील पेपरफुटीसारख्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कठोर आणि पारदर्शक व्यवस्था करण्याची, पेपरफुटी प्रकरणात सहभागी सर्व गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची, तसेच पीडित विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवून त्यांना तात्काळ न्याय देण्याची जोरदार मागणी करण्यात आली. निवेदन सादर करताना माजी मंत्री राजेंद्र मुळक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मीताई बर्वे, माजी जिल्हा परिषद सदस्य अर्चनाताई भोयर, सभापती राजु कुसुंबे,श्रीधर झाडे, डूमन चकोले, सलीम वाघडे, दीपक भोयर, धर्मपाल दिवते, इंद्रपाल गोरले, वैभव खोब्रागडे, सुहास कापसे, उपस्थित होते. अनिल सोनकुसरे, सह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थीती होती.

नगर बळाचा वापर करणे अन्यायकारक जंतरमंतरवर शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्याथ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याबाबत नागरिकांनी तीव्र दुःख आणि संताप व्यक्त केला. न्याय आणि आपल्या हक्कांसाठी लोकशाही मागनि आंदोलन करणाऱ्या विद्याथ्यांविरुद्ध बळाचा वापर करणे पूर्णपणे अन्यायकारक होते, असे त्या निवेदनात म्हटले आहे.पंचायत विरोधी गटनेते धरमदास दिवटे, रमेश कारेमोरे, सा बबनराव झाडे, नगरसेवक डॉ. अ इरफान, नगरसेविका शुभांगी तरारे, सा नगरसेविका रुबिना वाघाडे, सुभाष तडस, किरण पुजणे, गजबजरे, गजराज पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. माजी उपाध्यक्ष चेतन देशमुख, साकेत पनवेलकर, चक्रधर खेरगडे यांच्यासह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक नागरिक उपस्थित होते.

कन्हान शहर प्रतिनिधी – मनिषा दिलीप मेश्राम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *