विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी भंडारा जिल्हा वाहतूक शाखा ॲक्शन मोडमध्ये; शाळा-महाविद्यालयांना भेटी देत केले मार्गदर्शन;

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी भंडारा जिल्हा वाहतूक शाखा ॲक्शन मोडमध्ये; शाळा-महाविद्यालयांना भेटी देत केले मार्गदर्शन;

 

भंडारा:विद्यार्थ्यांचा शालेय प्रवास सुरक्षित व्हावा आणि वाहतुकीचे नियम पाळले जावेत, यासाठी भंडारा जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत वाहतूक पोलिसांच्या पथकाने जिल्ह्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयांना प्रत्यक्ष भेटी देऊन विद्यार्थी, वाहनचालक आणि शाळा प्रशासनाला महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.शाळा व्यवस्थापनावर मोठी जबाबदारीवाहतूक शाखेने स्पष्ट केले की, प्रत्येक शाळेने आपल्या स्तरावर तातडीने ‘शाळा परिवहन समिती’ (School Transport Committee) स्थापन करणे बंधनकारक आहे. शाळा परिसरात विद्यार्थी वाहनात चढत असताना किंवा उतरत असताना वाहतुकीला कोणताही अडथळा होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. तसेच, अनधिकृत किंवा वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनांमधून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाऊ नये, असे कडक आवाहन यावेळी करण्यात आले.वाहनचालकांसाठी कडक नियमावलीशालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या तपासणीवर वाहतूक शाखेने भर दिला आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील बाबी तपासल्या जात आहेत आणि त्या पूर्ण ठेवण्याचे निर्देश दिले आहेत:वाहनांची कागदपत्रे: वाहनाचा विमा, योग्यता प्रमाणपत्र (Fitness Certificate) आणि कर (Tax) भरल्याची पावती अद्ययावत असणे आवश्यक आहे.परवाने व बॅज: चालकाकडे वैध व्यावसायिक ड्रायव्हिंग लायसन्स (Badge सह) असणे अनिवार्य आहे.स्कूल बसचे नियम: विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनावर स्पष्टपणे “शाळा कर्तव्यावर” (ON SCHOOL DUTY) असे लिहिलेले असणे गरजेचे आहे.विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि इतर नियमवाहतूक शाखेने शाळांना ‘सुरक्षा मानकांचे’ (Safety Norms) काटेकोर पालन करण्याचे सांगितले आहे. स्कूल बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसवले जाऊ नयेत, वाहनांना स्पीड गव्हर्नर (Speed Governor) लावलेले असावे आणि आपत्कालीन दरवाजा सुस्थितीत असावा. यासोबतच, वाहनचालकांचे पोलीस चारित्र्य पडताळणी (Police Verification) करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.”विद्यार्थ्यांची सुरक्षा ही आमची पहिली प्राथमिकता आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या स्कूल बस किंवा इतर वाहनांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा इशारा जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने देण्यात आला आहे. या मार्गदर्शनामुळे शाळा प्रशासन आणि वाहनचालकांमध्ये जागृतता निर्माण झाली आहे.

या वेळी जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक कृष्णा तिवारी साहेब,पोलीस उपनिरीक्षक पुंडे, सहाय्यक फौ. चोपकर,पोलीस अंमलदार सागर मोहतुरे तसेच शाळेतील मुख्याध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते,आणि मोलाचे मार्गदर्शन लाभले.

 

भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *