मौदा पोलिसांची धडक कारवाई:
७ गोवंशांची सुटका, एकाला अटक तर दुसरा फरार
मौदा:
अवैध रीतीने कत्तलीसाठी गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्या टोळीवर मौदा पोलिसांनी २५ मे २०२६ रोजी धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत ७ गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली असून ६.७० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, मौदा पोलिसांनी मौजा मारोडी शिवार नजीक असलेल्या कालव्यापाशी नाकाबंदी केली होती. यावेळी संशयितरीत्या येणारी महिंद्रा बोलेरो पिकअप (क्र. MH 40/CS 8501) थांबवून तपासणी केली असता, त्यात अत्यंत निर्दयपणे ७ गोवंश कोंडलेले आढळले. या जनावरांना चारा-पाण्याची कोणतीही सोय नसून त्यांचे शिंगे आणि पाय दोरीने बांधलेले होते.
आरोपींची माहिती:
१) विक्की पंढरी सेलोकर (वय २३, रा. कोंढा): याला पोलिसांनी जागीच ताब्यात घेतले आहे.
२) प्रकाश बोरकर (रा. खराडा पुनर्वसन): हा आरोपी पोलिसांना पाहून घटनास्थळावरून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
६,००,०००/- रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो पिकअप.
७०,०००/- रुपये किमतीचे ७ गोवंश जनावरे.
एकूण ६,७०,०००/- रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करण्यात आला.
या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० (कलम ११(१), ड, इ, फ) आणि महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मौदा पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे अवैध जनावरांच्या तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.
नागपुर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार
