पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद; ९० उमेदवारांची अंतिम निवड

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद; ९० उमेदवारांची अंतिम निवड

 

 

जिंतूर प्रतिनिधी मनोज टाक:

 

परभणी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी व श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर वरिष्ठ महाविद्यालय, जिंतूर यांच्या आणि अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर दिंडोरी प्रणित नाशिक शाखा जिंतूर संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. ३१ जुलै २०२६ रोजी महाविद्यालयाच्या परिसरात पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

या रोजगार मेळाव्यात विविध क्षेत्रांतील १६ नामांकित आस्थापनांनी सहभाग नोंदविला. मेळाव्यास १७० सुशिक्षित बेरोजगार उमेदवार उपस्थित होते. त्यापैकी १३६ उमेदवारांची प्राथमिक निवड, तर ९० उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली. त्यामुळे अनेक युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध झाली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. खंडेराव भिसे, प्राचार्य, श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर वरिष्ठ महाविद्यालय, जिंतूर हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून मिटकुळे सर, प्राचार्य, श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर वरिष्ठ महाविद्यालय, जिंतूर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाधान किरवले, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी यांनी केले.

रोजगार मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यामध्ये योगेश येडपलवार (कनिष्ठ कौशल्य विकास मार्गदर्शन अधिकारी), राहुल गजभारे, सचिन चव्हाण, राहुल काळे, प्रियंका कणके, शीला भालेराव, आणि विवेक भारती, अमित घुगे, किरण गजमल यांचा सक्रिय सहभाग होता.

रोजगार मेळाव्यामुळे परिसरातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *