*सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त भीमराव खंडाळे यांची नागपूरला भेट; जुन्या आठवणींना उजाळा*
नागपूर : सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त श्री. भीमराव खंडाळे हे न्यायालयीन साक्षीसाठी मुंबईहून नागपूर येथे आले असता, त्यांचे जुने सहकारी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी रमेश कनेरे आणि मित्र पंकज नेरकर यांनी त्यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान पोलीस सेवेत एकत्रितपणे काम केलेल्या काळातील आठवणींना उजाळा मिळाला. *रमेश कनेरे हे नागपूर शहर पोलीस दलात कार्यरत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. बी. गोरे यांचे लेखनिक* *म्हणून काम पाहत होते. त्यावेळी श्री. भीमराव खंडाळे हे सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. कालांतराने दोघेही सेवानिवृत्त झाले असले, तरी जुन्या सहकाऱ्यांमधील जिव्हाळा कायम असल्याचे या भेटीतून दिसून आले*.
सेवेतील अनुभव, जुने सहकारी आणि आठवणी यांची उजळणी करत झालेली ही भेट भावनिक ठरली. पोलीस सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही सहकाऱ्यांमधील मैत्री आणि आपुलकी टिकून राहणे, हे या भेटीचे विशेष वैशिष्ट्य ठरले.
*रिपोर्टर : जयश्री चव्हाण*
*सी टी इंडिया न्यूज*
