महागाव येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महिला बचत गटांसाठी २दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम चार बॅचमध्ये यशस्वी रित्या पार पडला
प्रतिनिधी राम चव्हाण महागांव
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महागाव तालुक्यात महिला बचत गट सदस्यांसाठी आयोजित दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन हा कार्यक्रम चार बॅचमध्ये आयोजित करण्यात आला.
या प्रशिक्षणास जिल्हा स्तरावरून भारत चव्हाण सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच ब्लॉक स्तरावरून बीआरसी बाईक सर, खंदारे सर आणि चव्हाण मॅडम यांनी मार्गदर्शन केले.
हा संपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम AFC India Ltd, नवी दिल्ली यांच्या प्रशिक्षकांमार्फत घेण्यात आला. प्रशिक्षक म्हणून पुंडलिक वैद्य सर, अशोक वाटकर सर, मारोती वेलाडे सर, विजय राठोड सर, सपना राठोड मॅडम, संतोष नरवाडे सर आणि मार्तंड सर यांनी सखोल मार्गदर्शन केले.प्रशिक्षण स्थळे:
• दोन बॅच – सतीश मंगल कार्यालय, महागाव
• एक बॅच – शिंदे फार्म, उटी रोड परिसर
• एक बॅच – मुदाना ग्रामपंचायत, निजधाम विद्यालय येथे
या प्रशिक्षणामध्ये केवळ महिला बचत गट सदस्यांनी सहभाग नोंदवला. गावपातळीवरील स्वच्छता मोहिमेत महिलांचा सक्रिय सहभाग वाढवणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.पहिल्या दिवशी स्वच्छ भारत मिशनची उद्दिष्टे, ओडीएफ प्लस, घनकचरा व द्रवकचरा व्यवस्थापन, कचरा वर्गीकरण आणि प्लास्टिकमुक्त गाव संकल्पना यावर मार्गदर्शन करण्यात आले. दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष प्रात्यक्षिके, गटचर्चा आणि गावनिहाय कृती आराखडा तयार करण्यात आला.
प्रशिक्षकांनी महिलांना सेंद्रिय कचऱ्यापासून खतनिर्मिती, कचरा व्यवस्थापनातून उत्पन्नाच्या संधी आणि स्वच्छतेद्वारे आरोग्य सुधारणा याबाबत माहिती दिली.
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी सर्व सहभागी महिलांना प्रमाणपत्रे देण्यात आली. महिलांनी आपल्या गावात स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिकमुक्त वातावरण निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त केला.
