सिटी क्रिकेट अकादमीच्या अंडर-१४ संघाचा विजय.
हिंगणा प्रतिनिधी – सुकन्या थडकर
हिंगणा : हिंगणा सिटी क्रिकेट अकादमीच्या अंडर-१४ संघाने मुजुमदार क्रिकेट अकादमीवर शानदार विजय मिळवला. हा सामना कामठी येथील पोर्वाल मैदानावर खेळविण्यात आला.
मुजुमदार क्रिकेट अकादमीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या संघाने ३५.२ षटकांत १२२ धावा केल्या. जयन घोटेकर (२९) व अरिन चंदेरकर (२७) यांनी धावांचे योगदान दिले.हिंगणा सिटी क्रिकेट अकादमीकडून उत्कृष्ट गोलंदाजी करण्यात आली. ललित बघेले यांनी १० षटकांत २८ धावा देत ३ बळी घेतले, तर मोहम्मद अमान यांनी २ बळी घेतले. नैतिक वाघमारे आणि हर्षित सोनुरकर यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
१२२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्र्रोत सांचेला (२२) व जीत गोंडाणे (३०) यांच्यात ५० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. अविनाश सिंहने ९ चेंडूत १६ धावांची जलद खेळी करत संघाला ३०.२ षटकांत विजय मिळवून दिला.उत्कृष्ट गोलंदाजीबद्दल ललित बघेले यांना सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. या विजयासह हिंगणा सिटी क्रिकेट अकादमीला स्पर्धेत ४ गुण मिळाले.
संघाचे खेळाडू मुख्य प्रशिक्षक आकाश भोद्दे तसेच सहाय्यक प्रशिक्षक राज सिरसवार आणि आयेशा सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात.
