मोहाडी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध रेती वाहतूक सुरूच….!!

मोहाडी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध रेती वाहतूक सुरूच….!!

 

एकुण 6,06,100/- रुपयांचा मुद्देमाल जप्त…..!!

भंडारा:- मोहाडी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टाफ माने सर बीट मध्ये पेट्रोलिंग करीत असताना रामपूर ते चिचखेडा पांधण रस्त्यावर निळ्या पांढऱ्या रंगाच्या स्वराज ट्रॅक्टर मिळून आल्याने त्यांना वेद रेती वाहतूक चे परवाना विचारले असता त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे परवाना आढळून आले नाही, अवैध विचार येते वाहतूक करताना मिळून आला. व पंचायत समक्ष त्यांच्याकडून एक ब्रास रेती किंमत 6000 रुपये, मिळालेला पांढरा निळ्या रंगाच्या स्वराज ट्रॅक्टर 744 xt कंपनीचा MH -36 AR- 1869 किंमत 5,00000/- रुपये,त्याला लागुन असलेल्या विना क्रमांकाचे निळ्या पांढरा रंगाचे ट्रॉली चेसीस क्रमांक vt/12/2019/672 किंमत 1,00000/- रुपये,त्या मध्ये एक ब्रास रेती किंमत 6000/- रुपये,एक लाकडी दांड असलेला एक लोखंडी पावडा किंमत 50/- रुपये,एक प्लास्टिक घमेला किंमत 50/- रुपये,असा एकुण 6,06,100/- रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रात्रं दिवस तुमसर मार्गे मोहाडी वरटी या मार्गे अवैध रेती वाहतूक ट्रक नी होत असुन तेथील स्थानिक पोलिस स्टेशन फक्त नाममात्र कारवाही करीत असल्याचे दिसुन येत असतो. सर्व सामान्य तालुक्यातील नागरीकांना दिसुन येत असतो तर यांनाच का म्हणुन दिसत नाही…ट्रॅक्टर चालक आरोपी श्री. देवेंद्र श्यामराव सव्वालाखे वय 37 वर्ष रा. रामपुर तालुका मोहाडी, जिल्हा भंडारा यांचे विरुद्ध अप क्रमांक 150/2026 कलम 303(2) भा. न्या. स. सह कलम 48(8) महाराष्ट्र ज.म. सं. 7,9 पर्यावरण संरक्षण अधी. सहकलम 50/177 मो.वा.का. कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाही मा.पोलीस अधीक्षक भंडारा श्री. नुरुल हसन साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री निलेश मोरे साहेब,मोहाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. सुरेंद्र बेलखेडे साहेब,यांचे मार्गदर्शनात पोलीस शिपाई मालाधरे ,पोलीस स्टेशन मोहाडी यांनी केली असुन पुढील तपास पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करीत आहेत.

 

भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *