*सरकारने आपल्या जंगलांना कम्पाउन्ड करावे किंवा वन्यजीव कायदा रद्द करावा- रेखलाल टेंभरे किसान नेते गोरेगांव*
जंगल परिसर जवळील शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची शेती ही वन्य प्राण्यांमुळे तोट्याची होत चालली आहे. सोबत त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाले आहे व मोठा आर्थिक फटका बसत आहे. हाता तोडाला आलेली पीके नष्ट केली जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांची शेती ही तोट्याची होत चालली आहे. मागे सोनेगांव येथील शेतकऱ्याला शेतात काम करतांना जंगली जनावराने मारल्यामुळे आपले जीव गमवावे लागले आहे. तर अनेक ठिकाणी वाघाचे हल्ले झाले व अनेकांना रानडूकरांच्या हल्ल्यात प्राण गमाव लागले आहे अशा स्थितीत वन विभाग कडून तूटपूंजी मरत मिळते व शेवटी ज्याचे नुकसान झाले त्याचेच होते अशी स्थिती समाजात बघावयास मिळते आहे.
या पार्श्वभूमीवर वन विभागाने आपल्या जंगलांना पूर्ण कूंपन करावे अन्यथा वन्यजीव कायदा रद्द करावे अशा आाशयाचे पत्र वनमंत्री व मा. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस साहेबांना किसान नेते श्री रेखलालभाऊ टेंभरे यांनी लिहिले आहे.
निवेदनात श्री रेखलालभाऊ टेंभरे यांनी म्हटले आहे की, गोरेगांव तालुक्यात कटंगी, सोनेगांव, शहारवाणी, बोळूंदा, तिल्ली/मोहगांव, कलपाथरी, आदि जंगल जवळील गावांमध्ये वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रानडूक्कर, मोर, हरीण, वानर, या सारखे प्राणी शेतकऱ्यांच्या शेत पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस करत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. वन्यप्राण्यांमुळे नुकसान झाल्यास तातडीने नुकसान भरपाई द्यावी.
तसेच ज्यांच्या जीव गेला आहे त्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयाची भरपाई, तर गंभीर जखमी शेतकऱ्यांना 50 लक्ष्ा रुपये आणि कीरकोळ जखमी, ग्रस्तीत शेतऱ्यांना 25 लक्ष रुपये द्यावेत अशी मागणी किसान नेते रेखलालभाऊ टेंभरे यांनी केली आहे.
गोरेगाव तालुका प्रतिनिधी महादेव शेन्डे
