महागाव/घानमुख ग्रामपंचायतीतील निधी अपहार प्रकरण तापले 20 तारखेपासून आमरण उपोषणाची चेतावणी
यवतमाळ प्रतिनिधी एस के शब्बीर
महागाव तालुक्यातील घानमुख ग्रामपंचायतीमध्ये विकासकामांसाठी प्राप्त झालेल्या निधीच्या कथित अपहाराच्या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. याबाबत ग्रामस्थ श्री. राम उत्तम जाधव (रा. घानमुख, ता. महागाव, जि. यवतमाळ) यांनी संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाईची मागणी करत आंदोलनाचा इशारादिलाआहे.तक्रारीनुसार, १५व्या वित्त आयोगांतर्गत ग्रामपंचायतीला विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर झाला होता. मात्र तत्कालीन सचिव श्री. एस.पी. टारफे, तत्कालीन सरपंच श्री. रवि दिलीप चवरे, विद्यमान सचिव श्री. अशोक व्ही. हजारे, सरपंच सौ. सुलोचना लक्ष्मण इंगळे तसेच कनिष्ठ अभियंता श्री. प्रवीण सलामे यांनी संगनमत करून कामांमध्ये अनियमितता केल्याचा आरोप आहे. प्रत्यक्ष कामे न करता केवळ कागदोपत्री दाखले तयार करून शासन व ग्रामस्थांची फसवणूक करण्यात आल्याचे म्हटले आहे.चौकशी अहवालानुसार सुमारे १३ लाख ३६ हजार १६१ रुपयांचा निधी अपहार झाल्याचे उघड झाल्याचा दावा करण्यात येत असून संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करून जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, या प्रकरणात दोन ग्रामसेवकांना तात्काळ निलंबित करण्यात आले असताना, कनिष्ठ अभियंता प्रवीण सलामे यांच्यावर मात्र अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. “दोन ग्रामसेवकांवर कारवाई झाली, मग प्रवीण सलामे यांना निलंबित का करण्यात आले नाही?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यांना जाणीवपूर्वक पाठीशी घातले जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.संबंधितांवर कारवाई न झाल्यास 20 तारखेपासून पंचायत समिती, महागाव येथे आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच प्रवीण सलामे यांच्या नागपूर, यवतमाळ व आर्णी येथील मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी आंदोलनाच्या प्रमुख मुद्द्यांमध्ये समाविष्ट आहे.याशिवाय वाकोडी, धारेगावसह इतर गावांतील नागरिकही या उपोषणाला पाठिंबा देणार असल्याचे समजते. या प्रकरणामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून योग्य ती कारवाई करावी,
