तलवार बाळगून फिरणा-या इसमावर स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई
यवतमाळ प्रतिनिधी एस के शब्बीर
उमरखेड बिटरगाव पोलीस स्टेशन हद्दीत अवैध शस्त्र ताब्यात बाळगून दहशत निर्माण करणा-या इसमांबाबत गोपनिय माहीती काढून आरोपीच्या हातात एल सी बी पथकाच्या बेड्या दिनांक २३/०३/२०२६रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागात पोलीस स्टेशन बिटरगांव ढाणकी हद्दीतील ६ वाजण्याचे सुमारांस पेट्रोलींग करीत असतांना टेंभेश्वर नगर ढाणकी येथील इसम नामे-अविनाश कानबा प्रेमलवाड यांचे जवळ लोखंडी धारधार तलवार असून तो ढाणकी ते मेट रोड लगत असलेल्या नगर पंचायत सार्वजनिक विहीरी जवळ थांबला असून तो सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुव्यवस्था भंग करुन दखलपात्र गुन्हा करण्याचे करण्याची शक्यता आहे अशी मुखबीरव्दारे खात्रीशिर माहीती मिळाल्याने नमूद पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे दोन पंचासह ढाणकी ते मेट रोड लगत असलेल्या नगर पंचायत सार्वजनिक विहीरी येथे रवाना होवून संशयीत इसम नामे–अविनाश कानबा प्रेमलवाड यास ताब्यात घेवून पंचा समक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्यांच्या जवळ कमरेला एक लोखंडी टोकदार धारधार तलवार किंमत २०००/-रुचा स्वतःच्या ताब्यात बाळगुन असतांना मिळून आल्याने ती जप्त करुन ताब्यात घेवून इसम नामे अविनाश कानबा प्रेमलवाड वय २९वर्ष, रा.टेंभेश्वर नगर ढाणकी ता.उमरखेड जि. यवतमाळ यांच्या विरुध्द पोलीस स्टेशन बिटरगांव येथे कलम 4, 25 भारतीय हत्यार कायदया अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा.अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात (म.पो.से) सा, तसेच मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात.धिरज बांडे, पोउपनि.शरद लोहकरे, मुन्ना आडे, संतोष भोरगे,तेजाब रणखांब, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, रमेश राठोड, सुनिल पंडागळे,रविंद्र शिरामे, राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
