हिंगोलीच्या पठाडे महाविद्यालयात युवक नेतृत्व शिबिर व शहीद दिन

हिंगोलीच्या पठाडे महाविद्यालयात युवक नेतृत्व शिबिर व शहीद दिन

हिंगोली प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे

हिंगोली येथील संत श्रेष्ठ नामदेव महाराज पठाडे कला व विज्ञान महाविद्यालयामध्ये 23 मार्च रोजी जिल्हास्तरीय (हिंगोली व परभणी) युवक युवती नेतृत्व विकास कार्यशाळेच्या चौथ्या दिवशी सर्वप्रथम शहीद दिनानिमित्त ,भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर महाविद्यालयामध्ये भगतसिंग सुखदेव व राजगुरू या क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन करण्यात आले. सदरील उपक्रमाचे आयोजन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड ,राष्ट्रीय सेवा योजना , संत श्रेष्ठ नामदेव महाराज पठाडे महाविद्यालय,केंद्र शासना अंतर्गत असलेले” माय भारत केंद्र” हिंगोली जिल्हा, च्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण संघाचे राज्यकार्याध्यक्ष पत्रकार डॉ. विजय निलावार,संगणक तज्ञ प्रा. विजयकुमार कांबळे व नितीन चोंढेकर, गणेश साहू आदी उपस्थित होते. सर्वप्रथम दीप प्रज्वलन आणि थोर राष्ट्रभक्त शहीद भगत सिंग, सुखदेव व राजगुरूंच्या प्रतिमेचे पूजन करून डॉ.विजय निलावार व उपस्थित गन्मान्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.राष्ट्रीय सेवा योजनेमुळे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुणांत वाढ होते त्यासाठी आयोजकांनी केलेले परिश्रम वाखाणण्याजोगे असून ” माय भारत ” केंद्राच्या उद्दिष्ट्ये सफल करत असल्या बद्दल सर्व सहभागी चे करावे तेवढे कौतुक थोडेच असे म्हणून डॉ.निलावार ह्यांनी अभिनंदन केले.युवक नेतृत्व विकासा च उत्तम उदाहरण म्हणजे ह्या महाविद्यालयाचे जनक डॉ.लक्ष्मणराव पठाडे हे सामाजिक क्षेत्रात राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी असत त्या काळात त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले त्यावेळेस एका पुरस्कार निवड समितीत मी होतो अन् आज त्यांनी हे महाविद्यालय निर्माण करून युवक नेतृत्व विकास कसा होतो हे दाखवून दिलं असे म्हटले.संगणकीय युगात” ये आय ” प्रणाली काळाची गरज बनलेली असल्याने विद्यार्थ्यांनी मोबाईल ऐवजी वाचन वाढवून बौद्धिक क्षमता वृद्धिंगत करावी असे संगणक तज्ञ प्रा. विजयकुमार कांबळे म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. माणिक ढोकळे यांनी यशस्वी आयोजना बद्दल कौतुक करून विद्यार्थ्यांनी विद्यापीठ महाविद्यालय आणि” माय भारत ” केंद्राच्या योजनांचा लाभ घ्यावा अस आवाहन समारोपीय भाषणातून केलं. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रभाकर कऱ्हाळे, प्रा. विक्रम भागत, प्रा. माया जाधव, प्रा. विद्या मोरे, प्रा. तेजश्री सिंगन पालकर, प्रा. शुभांगी तगलपलेवार,एन एस एस.प्रमुख प्रा. सुभाष चव्हाण, अशोक लोंढे, नानाभाऊ दशरथे, गणेश वाढवे, अमोल कऱ्हाळे,आदिसह राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अशोक लोंढे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.विक्रम भगत यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *