सौ. रंजना दीपक आडे यांच्या अध्यक्षपदाचा पहिल्या महिन्याचा कामाचा लेखाजोखा

सौ. रंजना दीपक आडे यांच्या अध्यक्षपदाचा पहिल्या महिन्याचा कामाचा लेखाजोखा

 

 

 

यवतमाळ प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव

 

 

 

नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून अवघ्या एका महिन्यात सौ. रंजना दीपक आडे यांनी विकासकामांचा धडाका लावत नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. कोणतेही द्वेषाचे राजकारण न करता सर्व नगरसेवक व नागरिकांना सोबत घेऊन शहराच्या विकासासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील आहेत. महागाव नगरपंचायत इमारत स्वतंत्र राहावी यासाठी भाजपा चे यवतमाळ जिल्हा समन्वयक श्री.नितीन भुतडा व उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार किसनराव वानखेडे यांनी पाठपुरावा करण्यात आला.आहे महागाव शहरातील विविध ठिकाणी साचलेला नाल्या व घन कचरा नियोजनबद्ध पद्धतीने साफ करून डम्पिंग ग्राउंड शहराबाहेर येथे टाकण्यात आला, त्यामुळे शहर स्वच्छतेकडे मोठे पाऊल उचलण्यात आले. व घरकुल योजनेतील प्रलंबित लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा व्हावा यासाठी तात्काळ प्रयत्न करण्यात आले तसेच वाढीव घरकुल मंजूर व्हावे यासाठी नवीन प्रस्ताव सुद्धा सादर करण्यात आला.शहरातील प्रभाग क्रमांक 1 ते 17 मध्ये नाल्यांची स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली असून उर्वरित काम देखील काही दिवसांत पूर्ण होणार आहे. अल्पावधीतच विकासकामांवर भर देत महागाव शहर स्वच्छ, सुंदर आणि प्रगत करण्याचा संकल्प सौ. रंजना दीपक आडे यांनी केला असून त्यांच्या नेतृत्वात महागाव शहर विकासाच्या नव्या वाटेवर पुढे जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *