पोस्को कायद्यांतर्गत लॉज मालक यांना अटक….
भंडारा:- भंडारा जिल्ह्यामधील अड्याळ पोलीस स्टेशन येथे एका अल्पवयीन मुलीचे तक्रारीवरून आरोपी विरुद्ध अप क्रमांक 180/2026 कलम 64 (1)(एम) भान्यास सह कलम 4.6 पोक्सो सह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी साकोली अतिरिक्त कार्यभार उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पवनी श्री. शिवम विसापूरे हे करीत आहेत. सदर गुन्ह्याच्या तपास अमन रिसॉर्ट श्रीनगर चे मालक अमन नूतनलाल वाघमारे वय 21 वर्षे राहणार पांढराबोडी यांनी गुन्ह्यातील आरोपी साजिद सिराज शेख राहणार भंडारा व अल्पवयीन मुलगी व 17 वर्षे तीन महिने यांना कोणत्याच प्रकारची विचारपूस न करता अल्पवयीन मुलीचे कोणत्याच प्रकारचे कागदपत्रे वयाचे दाखल्याची पाहणी न करता त्यांनी आपले रिसॉर्टचे रूम मध्ये राहण्याकरिता जागा दिली. सदर रिसॉर्ट मालक यांनी आरोपी यास गुन्हा करण्यास अप प्रेरणा दिल्याने तपासात निष्पन्न झाल्याने सदर रिसॉर्ट लॉज चे मालक याला पोक्सो कायद्याचे कलम 17 अन्वये गुन्हा करण्यास जागा उपलब्ध करून दिली म्हणून नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आले आहे.
तरीपण सर्व रेस्टॉरंट व रिसॉर्ट मालकांना पोलीस दलातर्फे जाहीर आव्हान करण्यात आले. आपले रिसॉर्ट किंवा लॉज मध्ये कोणत्याही अल्पवयीन व्यक्तींना बेकायदेशीर राहू देऊ नये अन्यथा अशाच प्रकारचे आपल्यावर सुद्धा कारवाई करण्यात येणार. असे आवाहन भंडारा जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक नुरूल हसन साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे साहेब यांच्यातर्फे देण्यात आले. यांचे मारगदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापूरे यांचे आदेशान्वये देण्यात आले.
भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार
