चाळीसगाव प्रादेशिक वन विभागात गंभीर प्रकार – कार्यालयीन वेळेत

चाळीसगाव प्रादेशिक वन विभागात गंभीर प्रकार – कार्यालयीन वेळेत अधिकारी कर्मचारी यांची लाकूड माफियांसोबत ओली पार्टी ; चौकशी सुरू

चाळीसगाव – प्रादेशिक वन विभागातील शासकीय शिस्तीला धक्का देणारा एक गंभीर प्रकार समोर आला असून, चाळीसगाव येथील प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) यांच्याविरुद्ध अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अधिकाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत आपल्या कार्यक्षेत्रातील उत्तमराव पाटील वन उद्यानात अधिकारी व त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांसह सदर ओली पार्टी आयोजित केली या पार्टीत मटणा सह दारूचा देखील मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याचे गुप्त सूत्रांकडून कळते. सदर पार्टीचे नियोजन यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहभागामुळे दुपारी ४ वाजे पर्यंत प्रादेशिक वन विभागाच्या कार्यालयाचे कामकाज पूर्ण पणे ठप्प झाले होते.

दुपारी सुमारे ४ वाजता संबंधित अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनि वर संपर्क साधला असता त्यांनी “लंच ब्रेकमध्ये आलो होतो” असे स्पष्टीकरण दिले. यापूर्वी “मीटिंग होती” असेही सांगण्यात आल्याने त्यांच्या वक्तव्यांमध्ये विसंगती आढळून आली आहे.

सदर तक्रारीची गंभीरता लक्षात घेता, क्राईम अँड करप्शन कंट्रोल असोसिएशनचे महासंचालक श्री. दिनेशजी गुप्ता व संचालक यांच्या वतीने प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे अधिकृत तक्रार सादर करण्यात आली आहे. दरम्यान, प्रादेशिक वन  विभागाचे उपवनसंरक्षक, जळगाव यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेत चौकशी प्रक्रिया सुरू केल्याचे समोर आले आहे.

सदर प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांवर कर्तव्यच्युती, शिस्तभंग व शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याचे आरोप असून, तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, चौकशीदरम्यान CCTV फुटेज, कॉल रेकॉर्ड्स व लोकेशन डेटा तपासावा, तसेच संबंधितांची वैद्यकीय तपासणी करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

— समाप्त —

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *